पोषण महात महिला आयोगाचाही सहभाग

Update: 2022-09-14 11:06 GMT

महिला आणि बालकांच्या आरोग्य व पोषण (National Nutrition Month) विषयक स्थितीमध्ये सुधारणा घडवून आणण्याकरिता पोषण अभियानांतर्गत (Nutritipon Campaign)) दरवर्षी पोषण महिना व पोषण पंधरवडा साजरा करण्यात येतो . या उपक्रमांद्वारे जन आंदोलनातून समाजामध्ये जागृती घडवून आणण्याकरिता प्रयत्न केले जातात.केंद्र शासनाकडून सप्टेंबर महिना पोषण महा म्हणून साजरा करण्यात येतो.

त्यानुसार राज्य महिला आयोगाकडून अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत रायगडमध्ये शुक्रवारी पोषण पंचायत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमात आहारतज्ज्ञ, स्त्री रोग तज्ञ, अंगणवाडी सेविका, महिला, शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी होणार आहेत. पारंपारिक खाद्यातून पोषक आहार यावर यावेळी मार्गदर्शन करण्यात येईल. त्याचबरोबर रायगड जिल्ह्याची आढावा बैठक घेणार होणार आहे .या बैठकीत जिल्हाधिकारी, कामगार आयुक्त, पोलीस अधीक्षक तसेच आरोग्य, परिवहन, शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत .तसेच महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून "महिला आयोग आपल्या दारी" या उपक्रमांतर्गत रायगड जिल्ह्यात शुक्रवारी जिल्हा नियोजन भवन येथे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर तक्रारींची सुनावणी घेणार आहेत.

महाराष्ट्र राज्य महिला आयोग महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम चालू आहे.महिलांना त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी न्याय मिळावा यासाठी 'महिला आयोग आपल्या दारी' उपक्रम राबविण्यात येतो. यामध्ये विभाग स्तरावर महिलांच्या तक्रारीचे निवारण करण्याचा प्रयत्न केला जातो .या जनसुनावणीवेळी पोलीस, प्रशासन , विधी सल्लागार , समुपदेशक, जिल्हा समन्वयक उपस्थित राहणार आहेत.ग्रामीण भागातील महिलांना मुंबई कार्यालयात येऊन तक्रार करणे, सुनावणीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहणे आर्थिकदृष्ट्या तसेच इतर कारणामुळे शक्य होत नाही. त्यांना या उपक्रमाचा फायदा होतो . महिला आयोग आपल्या दारी अंतर्गत सुनावणी दरम्यान नव्या तक्रारीवर त्याच ठिकाणी कार्यवाही करण्यात येते, त्यामुळे आपली कैफियत मांडणाऱ्या महिलांना त्वरित दिलासा देण्याच काम आयोगाद्वारे केले जाते.

रायगड जिल्ह्यात होणाऱ्या जनसुनावणी अधिकाधिक महिलांना पुढे येऊन, न घाबरता आपल्या तक्रारी यावेळी मांडाव्या, असे आवाहन आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केले आहे.

Tags:    

Similar News