प्राजक्ता माळीच्या तक्रारीची महिला आयोगाने घेतली दखल !

Update: 2024-12-29 12:33 GMT

भाजप आमदार सुरेश धस यांनी संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाविषयी बोलताना धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली होती. सुरेश धस यांच्या आधी करुणा शर्मा यांनी एका प्रकरणात प्राजक्ता माळीचे नाव घेतले. अखेर या सर्व प्रकरणावर शनिवारी प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद घेत तिच्यावर करण्यात आलेल्या आरोपांचा निषेध केला आहे. आमदार सुरेश धस यांनी माझी जाहीर माफी मागावी अशी मागणी देखील प्राजक्ता माळीने केली. काल पत्रकार परिषद घेत प्राजक्तानं सुरेश धस आणि करुणा मुंडे यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. प्राजक्ता माळीने सुरेश धस यांच्या विरोधात महिला आयोगाकडे तक्रार नोंदवली होती. यावर आता महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आयोगाच्या वतीने प्रतिक्रिया दिली आहे.

रुपाली चाकणकर यांचे ट्वीट

"अभिनेत्री प्राजक्ता माळी यांची तक्रार आयोग कार्यालयास प्राप्त झाली आहे. त्याचा अभ्यास करून, कायदेशीर बाबी तपासून आवश्यक ती कार्यवाही नियमानुसार आयोग करेल. महिलांबाबत समाज माध्यमांसमोर बोलताना सर्वांनी भान ठेवलं पाहिजे,कारण संविधानाने दिलेल्या अधिकारामुळे सर्व क्षेत्रांमध्ये महिला स्वतःच्या कर्तुत्वावर काम करत आहेत आणि काम करत असताना समाज माध्यमांद्वारे केवळ त्या महिला आहेत म्हणून कोणताही पुरावा नसताना माध्यमांमध्ये त्यांच्या बाबतीत बदनामी करणारे वक्तव्य व त्याआधारे समाज माध्यमात सर्व घटकांनी शहानिशा न करता अतिशय घाणेरड्या पद्धतीने ट्रोल करणे याबाबत शासनाकडून कठोर कारवाई करणे बाबत आयोग पुढाकार घेईल." 

Tags:    

Similar News