मंत्रिमंडळात दादांची दादागिरी, चारचं बहिणींना संधी!
मंत्रिमंडळात दादांची दादागिरी, चारचं बहिणींना संधी! / Dad's bully in the cabinet, four sisters have a chance!;
भाजपच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारचा बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्तार रविवारी नागपुरातील एका समारंभात मंत्र्यांचा शपथविधी झाला. राज्य विधिमंडळाचे आठवडाभर चालणारे हिवाळी अधिवेशन 16 डिसेंबरपासून नागपुरात सुरू होण्याच्या एक दिवस आधी हा सोहळा झाला.
देवेंद्र फडणवीसांच्या नवीन मंत्रिमंडळात चार महिलांना संधी देण्यात आली आहे. यामध्ये भाजपाच्या तीन महिला आमदारांचा समावेश आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका महिला आमदाराचा समावेश आहे. एकनाथ शिंदे शिवसेनेने एकाही महिलेला संधी दिलेली नाही.
भाजप पक्षाकडून पंकजा मुंडे, मेघना बोर्डीकर आणि माधुरी मिसाळ यांना मंत्रिमंडळामध्ये संधी देण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसने दुसऱ्यांदा अदिती तटकरे यांना मंत्री मंडळात संधी दिली आहे.