अमृता फडणवीस यांच्या मराठमोळ्या लूकने वेधलं लक्ष!

Update: 2024-12-06 08:12 GMT

विधानसभा निवडणुकीत मोठ्या बहुमताने महायुतीचा विजय झाला. काल ५ डिसेंबर २०२४ रोजी आझाद मैदानात शपथविधी सोहळ्याचे नियोजन करण्यात आले होते. या शपथविधी सोहळ्यात मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली, तर एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि अजित पवार यांनी देखील मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. काल झालेल्या शपथविधी सोहळ्याला मोठमोठे नेते तसेच बॉलिवूड स्टार्स देखील उपस्थित आसल्याचे पाहायला मिळाले. काल झालेल्या शपथविधी सोहळ्यात म्हणजेच पहिल्याच टप्प्यात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी पार पडला. पण या महत्त्वाच्या दिवशी मिसेस मुख्यमंत्री म्हणजेच अमृता फडणवीस यांच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

पतीच्या मागे नेहमीच खंबीरपणे उभ्या असणाऱ्या अमृता फडणवीस यावेळी खूप आनंदी दिसत होत्या. शपथविधीपूर्वी अमृता फडणवीस यांचे भाषण झाले या भाषणात त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचे भरभरून कौतुक केले. पतीच्या यशाचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत होता. यावेळी देवेंद्र फडणवीस हे लोकहिताचा निर्णय घेतील असे त्यांनी सांगितले. अमृता फडणवीस यांचा मराठमोळा आणि सुंदर लूक सर्वांनाच खूप आवडला तर अमृता फडणवीसांचे भाषण सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. त्यात त्यांनी पिवळ्या रंगाची सुंदर पैठणी नेसली असून, साडीला शोभतील असे दागिने घातले आहेत. "देवेंद्र फडणवीस पुन्हा आलेत" असं म्हणत मिसेस मुख्यमंत्री अमृता फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीसांचे कौतुक केले आहे.

Full View

Tags:    

Similar News