अमरावतीत राहुल गांधींच्या बॅगची तपासणी, यशोमती ठाकूर संतापल्या

Update: 2024-11-16 10:16 GMT

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी निवडणूक आयोगाकडूनही कठोर पावलं उचलण्यात आली आहेत. अशातच अमरावतीच्या धामणगाव रेल्वे येथे राहुल गांधी यांच्या हेलिकॉप्टर आणि बॅगांची तपासणी केल्यानंतर काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. निवडणूक विभाग निष्पक्ष राहिलं पाहिजे असे मत यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केले आहे.

काय म्हणाल्या यशोमती ठाकूर ?

यशोमती ठाकूर म्हणाल्या की, निवडणूक विभाग निष्पक्ष राहिलं पाहिजे. जसे राहुल गांधी, उद्धव ठाकरे यांच्या बॅगांची तपासणी होते तशीच पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या बॅगांची आणि हेलिकॉप्टरची तपासणी का नाही होत? खोके तर हे लोक घेऊन गेले होते, आम्ही तर इथेच आहोत. शंभर टक्के निवडणूक विभाग दुजाभाव करत आहे. लोकशाही मध्ये समान न्याय हवा, अशी मागणी यशोमती ठाकूर यांनी केली आहे. तर पुढच्या काळात महाविकास आघाडीचं सरकार येणार असा दावा यशोमती ठाकूर यांनी केला आहे. 

Full View

Tags:    

Similar News