खाष्ट सासू म्हणत परत एका स्त्रीलाच बदनाम केलं, किशोरी पेडणेकर यांची राज ठाकरेंवर टीका
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर 'खाष्ट सासू' अशी टीका केल्यानंतर मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर या आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. तुमचीही बोयको आता सासू आहे, तुमच्या घरात पण असेच प्रकार घडत आहेत का? अशी टीका करत किशोरी पेडणेकर यांनी थेट राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
किशोरी पेडणेकर काय म्हणाल्या?
खाष्ट सासू म्हणत परत तुम्ही एका स्त्रीलाच बदनाम केलं आहे. तुमची पण बायको आता एक सासू आहे. कुठूनही फिरुन एका स्त्रीचीच बदनामी करताय, तुम्ही बदनाम करणारे कोण? खाष्ट सासू म्हणजे काय? तुमच्या घरात पण असेच प्रकार घडत आहेत का? तुमची बायको अमितच्या बायकोला खाष्टपणा दाखवतेय का? असे विविध प्रश्न किशोरी पेडणेकर यांनी उपस्थित केले आहेत. आम्हाला खाष्ट सासू मिळाली नाही, आम्हाला प्रेमळ सासू मिळाली, त्यामुळे खाष्ट सासू घरात आहे, म्हणून तुम्हाला उद्धव ठाकरेंचा स्वभाव खाष्ट सासू आठवला, खाष्ट सासू बोलणं म्हणजे महिलांचा अपमान आहे. महिलांची बदनामी करण्यात शिंदे गट, भाजप आणि महायुतीला मदत करणारे पक्ष त्यातील राज ठाकरेंचा पक्ष हा नेहमीच महिलांचा अपमान करतो, अशी टीका माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली.