पत्रकारितेतील महिलांना सन्मानाची वागणूक मिळालीच पाहिजे - रुपाली चाकणकर

Update: 2024-11-15 08:11 GMT

महिला पत्रकार यांनी सुनील शेळके, बापू भेगडे यांच्या प्रचार फेरी दरम्यान झालेल्या बाचाबाचीच्या घटनेचे वृत्तांकन केल्याने त्यांना किशोर भेगडे, संदीप भेगडे यांनी धमकी दिल्याची घटना घडली. आयोगाकडे श्रीमती राजापूरकर यांनी याबाबत तक्रार केली. त्यानुसार किशोर भेगडे, संदीप भेगडे यांच्यावर लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तातडीने या प्रकरणी कारवाई करण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत. तसेच विशेष पोलीस महानिरीक्षक, महिला व बाल अपराध प्रतिबंध विभाग आणि पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांना याबाबत सखोल चौकशी करून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल आयोग कार्यालयास तातडीने पाठविण्यात यावा अशी सूचना देखील देण्यात आली आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारितेतील महिलांना सन्मानाची वागणूक मिळालीच पाहिजे. राजकीय नेत्यांनी महिलांबाबत बोलताना, वागताना चुकीचे कृत्य केल्यास त्या विरोधात कडक कारवाई होईल यासाठी आयोग पाठपुरावा करेल. 

काय म्हणाल्या रुपाली चाकणकर?

रुपाली चाकणकर म्हणाल्या की, "अशाप्रकारे महिलांबरोबर वर्तन करणे हे अत्यंत चुकीच आहे. या प्रकरणावर महिला आयोगाने पत्र दिल आहे. राज्य महिला आयोगाने या प्रकरणी दखल घेतली असून, अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारितेतील महिलांना सन्मानाची वागणूक मिळालीच पाहिजे. राजकीय नेत्यांनी महिलांबाबत बोलताना, वागताना चुकीचे कृत्य केल्यास त्या विरोधात कडक कारवाई होईल यासाठी आयोग पाठपुरावा करेल".

Tags:    

Similar News