महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर औरंगाबाद दौऱ्यावर;पीडित महिलांची भेट घेणार
महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर आज औरंगाबाद दौऱ्यावर असून, पैठण तालुक्यात झालेल्या दरोडा आणि सामूहिक बलात्कार घटनेतील पीडित महिलांची भेट घेणार आहे. तसेच याचवेळी पोलिसांकडून घटनेची माहिती जाणून घेणार आहे.
औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील तोंडोळी गावातील एका शेत वस्तीवर सात दरोडेखोरांनी हल्ला चढवत दोन महिलांवर सामूहिक अत्याचार केला होता. या घटनेनंतर महाराष्ट्रभरात संताप व्यक्त केला जात होता. तर दोन दिवसांपूर्वी महिला आयोगाच्या अध्यक्ष पदाचा पदभार घेणाऱ्या चाकणकर आज पीडित कुटुंबाची भेट घेणार आहे.
रुपाली चाकणकर ह्या सकाळी 10.15 वाजता घटनास्थळी भेट देऊन,पीडितांशी चर्चा करणार असून, त्यानंतर बिडकीन पोलीस स्टेशनला भेट देणार आहे. तसेच घटना आणि तपासाबाबत पोलोसांशी चर्चा सुद्धा करणार असल्याची माहिती आहे.