राज-उद्धव एकत्र येणार..? शर्मिला ठाकरेंच्या प्रतिक्रियेनंतर चर्चेला उधाण
राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर शिवसेनेचे मोठे नुकसान झाल्याचं म्हटलं जात आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील 40 हून अधिक आमदार फोडले व देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सरकार स्थापन केलं. राज्यात झालेल्या या राजकीय घडामोडींनंतर पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावं अशी चर्चा सुरू झाली. आता याच चर्चेनंतर हा प्रश्न राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांना विचारला गेला. या प्रश्नावर त्यांनी हे दोघे एकत्र येण्याबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा या चर्चेला सुरुवात झाली आहे.
शर्मिला ठाकरे या आज माध्यमांशी बोलत असताना पत्रकारांनी त्यांना राज ठाकरे व उद्धव ठाकरे हे एकत्र येणार का? असे विचारल्यानंतर शर्मिला ठाकरे यांनी "त्यांनी साद घातली तर येऊ देत" असं म्हणत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यामुळे आता पुन्हा एकदा राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याची चर्चा जोरदार रंगली आहे. येणाऱ्या काळात ठाकरे बंधू एकत्र येणार का? याची सर्वांना उसुक्ता लागली आहे...