पंकजा मुंडे 'धनुभाऊ'ला राखी बांधणार का?
राजकीय विरोध असला तरीही त्यापलीकडे कौटुंबिक नात मात्र दोन्ही बहीण-भाऊ जपतात हे अनेकदा समोर आले आहे...
रक्षाबंधन (Raksha Bandhan 2021) हा सण 22 ऑगस्ट म्हणजेच आज रविवारी साजरा केला जात आहे. या दिवशी प्रत्येक बहिण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि स्वतःचे रक्षण करण्याचे वचन घेतात. राजकारणात सुद्धा अनेक बहीण-भावाची रक्षाबंधनाच्या दिवशी चर्चा होत असते. त्यातीलच एक म्हणजे भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे कॅबिनेट मंत्री धनजय मुंडे यांची चर्चा. राजकारणात एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले हे दोन्ही नेते किमान रक्षाबंधनाच्या दिवशी एकत्र येतील अशी सकारात्मक अपेक्षा कार्यकर्त्यांना असते.
कधीकाळी एकमेकांसाठी धावून येणारे हे दोन्ही भाऊ-बहीण आज वेगवेगळ्या पक्षात काम करतायत, त्यामुळे सहाजिकच दोघांचा एकमेकांना राजकीय विरोध असणारच. गेल्या काही दिवसांपासून हा विरोध अधिकीच वाढला आहे, दोन्ही बहीण-भाऊ एकमेकांवर आरोप करण्याची कोणतेही संधी सोडत नाही. पण राजकीय विरोध असला तरीही त्यापलीकडे कौटुंबिक नात मात्र दोन्ही बहीण-भाऊ जपतात हे अनेकदा समोर आले आहे...
त्यामुळे आता रक्षाबंधनाच्या दिवशी सुद्धा दोन्ही बहीण-भाऊ राजकीय विरोध बाजूला ठेवून एकत्र येतील का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहे. काही वेळापूर्वी पंकजा मुंडे यांनी रक्षाबंधनाच्या शुभेच्छा आपल्या सोशल अकाऊंटवरून दिल्या मात्र,त्यात कुठेही धनंजय मुंडे यांचा उल्लेख नव्हता. तर धनंजय मुंडे यांनी दिलेल्या शुभेच्छात सुद्धा पंकजा मुंडेंच्या उल्लेख नाहीच.