पंकजा मुंडे राज्यसभेला जाणार का? देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट!

Update: 2024-02-08 07:50 GMT

राज्यसभेच्या सहा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजपाकडून कोणाला उमेदवारी दिली जाणार? याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात चांगली रंगत आहे. याच दरम्यान, भाजपा नेत्या पंकजा मुंडे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच झालेली भेट चर्चेत आली होती. या भेटीमुळे पंकजा मुंडे राज्यसभेसाठी उमेदवार असतील का? अशी अटकळ बांधली जात होती. मात्र, आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अटकळांवर पूर्णविराम दिला आहे.


पंकजा मुंडे यांच्या राज्यसभेवरील उमेदवारी वरुन राजकीय वर्तुळात चांगल्याच चर्चा रंगल्या आहेत. या चर्चाना पूर्णमविराम देत फडणवीसांनी महाराष्ट्र राज्य भाजपाची भूमिका स्पष्ट केली आहे, आज नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना फडणवीस यांनी स्पष्ट केले की, "पंकजा मुंडे आणि माझी नेहमीच संघटनेच्या विषयांवर भेट होत असते. पण आमच्या या भेटीत राज्यसभेच्या उमेदवारीबाबत कोणतीही चर्चा झाली नाही." त्यांनी पुढे सांगितले की, "राज्यसभेच्या उमेदवारांवर निर्णय केंद्रीय नेतृत्व घेईल. पंकजा मुंडे या सध्या राष्ट्रीय मंत्री आहेत. त्यांना राज्यसभेला पाठवायचे की आणखी कोणते पद द्यायचे हे केंद्रीय नेतृत्व ठरवेल."

पंकजा मुंडे या भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी एक आहेत. त्यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत भाग घेतला नव्हता, त्या राजकीय आखड्या पासून गेल्या काही महिन्यापासून अलिप्त असल्याच म्हटल जातं. पंकजा मुंडे सध्या केंद्रीय मंत्री म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळेच राज्यसभेसाठी भाजपाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. राज्यसभेच्या उमेदवारांची घोषणा भाजप लवकरच करणार असून, या यादीत पंकजा मुंडे यांचे नाव असेल का? हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होईल.

Tags:    

Similar News