करुणा व धनंजय मुंडेंवर चित्रपट आला तर सुपर हिट होईल का?
करुणा व धनंजय मुंडेंवर चित्रपट आला तर सुपर हिट होईल का? काय म्हणाले आमदार अमित साटम पहा..;
सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या वरील आरोपामुळे चर्चेत असलेल्या त्यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनी 'शिवशक्ती सेना' पक्षाची स्थापना केली आणि आगामी काळात या पक्षाच्या माध्यमातून सर्व निवडणुका लढविण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आता त्या विधानसभेच्या कोल्हापूर उत्तर मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना धनंजय मुंडे यांच्या वरती त्यांनी अनेक गंभीर आरोप केले. "करुणा आणि धनंजय यांची प्रेम कहानी मराठीत येणार असून त्यावर काम सुरू आहे." असं करुणा मुंडे यांनी सांगितलं आणि सर्वत्र याची चर्चा सुरू झाली. काल आमदार अमित साटम यांना एका पत्रकाराने करुणा व धनंजय मुंडे यांच्यावर चित्रपट आला तर सुपरहिट होईल का असं विचारलं? त्यावर बोलताना त्यांनी "जर असा कोणी चित्रपट काढत असेल तर त्या चित्रपटाच्या कहाणी करताचे इनपुट त्यांनी त्या चित्रपटाच्या प्रोडूसरला द्यावेत. कुठला चित्रपट सुपर डुपर हिट होईल याच्यावर मी कसं बोलू कारण काही ज्योतिषी नाही" असं ते म्हणाले.