'रश्मी ठाकरेंच्या नावावरील जमिनीची पाहणी करणार'; सोमय्यांचा यादीत आता ठाकरे कुटुंब
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर 127 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. त्यासंबंधित पाहणीसाठी सोमय्या कोल्हापूरला निघाले असताना, त्यांना पोलिसांनी पहाटे कराडमध्ये उतरवलं. आता सोमय्या कराड शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेत आहेत. यावेळी त्यांनी आता घोटाळ्याच्या मालिकेत थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. आपण रश्मी ठाकरेंच्या नावावरील जमिनीची पाहणी करणार असल्याचं त्यांनी म्हंटल असल्याने आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
रश्मी ठाकरेंच्या नावावरील जमीन पाहणी करणार असल्याचे बोलत असताना आपण आणखी काही घोटाळे उघड करणार असल्याचा किरीट सोमय्यांचा इशारा थेट उद्धव ठाकरेंकडे तर नाही ना ? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहे. त्यामुळे किरीट सोमय्या रश्मी ठाकरेंच्या नावावरील जमीन पाहणी केल्यानंतर कोणते आरोप करणार किंवा याविषयी आणखी अजून काही प्रकरण समोर आणणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.