"महिलांना एक लाख देणार"; लोकसभा निवडणुकीदरम्यान सोनिया गांधींची मोठी घोषणा

Update: 2024-05-16 11:21 GMT

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान सुरु असताना काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी महिलांसाठी संदेश देत केंद्र सरकारला धारेवर धरलं आहे. यावेळी त्यांनी मोठी घोषणा केली. सोनिया गांधी यांनी सोमवारी ( 13 मे २०२४ ) एक व्हिडिओ संदेश जारी केला. स्वातंत्र्य लढ्यापासूनच आधुनिक भारताच्या उभारणीत महिलांनी मोठी भूमिका बजावली आहे.

आज महिलांना महागाईचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत आम्ही क्रांतिकारी गॅरंटी घेऊन आलो आहोत. तर काँग्रेसच्या महालक्ष्मी योजनेंतर्गत गरीब कुटुंबातील महिलेला दरवर्षी एक लाख रुपये दिले जाणार आहेत. "आमच्या गॅरंटीमुळे कर्नाटक आणि तेलंगणातील कोट्यावधी कुटुंबांचं जीवन आधीच बदललं आहे. मनरेगा असो, शिक्षणाचा अधिकार असो की अन्नसुरक्षेचा अधिकार असो. आमच्या या योजनांनी लोखो कुटुंबांना बळ दिलं आहे. हे काम पुढे नेण्यासाठी 'महालक्ष्मी' ही आमची सर्वात नवीन गॅरंटी आहे. " 

 

"या कठीण काळात काँग्रेसचा हात तुमच्या पाठीशी आहे. तसेच या कठीण काळात काँग्रेसचा हातच तुमची परिस्थिती बदलेल" असं म्हणत काँग्रेसने सोनिया गांधी यांचा व्हिडिओ संदेश सोशल मिडियावर शेअर केला आहे. 



Tags:    

Similar News