राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनाचा हा शेवटचा आठवडा चालू आहे. या संपूर्ण आशिवेशनात महिला आमदारांनी आपल्याला बोलायला वेळ मिळतं नसल्याची खदखद वारंवार व्यक्त केली. काल देखील भाजपच्या मनिषा चौधरी ल, भारती लव्हेकर यांनी सभागृहात वेळेची मर्यादा ठेवल्यानं आम्हांला बोलायला वेळ मिळत नसल्याची खदखद व्यक्त केली.
महिला आमदारांना मतदारसंघातील प्रश्न मांडता येत नाही बोलायला उभं राहिलं की बोलणं पूर्ण होण्याआगोदरच वेळ संपला जातो. त्यामुळे महिला आमदारांना त्यांचे प्रश्न मंडताच येत नाहीत. इन मिन २४ जणी महिला आमदार आहेत त्यांनाही पुरेसा वेळ दिला जात नसल्याने या संदर्भात उपाध्यक्षांना जाऊन आमचं गा-हाणं मांडलं आल्याचं त्यांनी सांगितलं.