मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत फूट पडली. भाजपच्या मदतीने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले . यावर अनेक प्रतिक्रिया शिवसैनिकांमधून व्यक्त झाल्या आहेत .दरम्यान एकनाथ शिंदे यांच्यामुळे शिवसेनेत फूट पडली यावर बोलताना "असं खिंडार वगैरे बोलू नका हा ... जे काही घडले ते वाईट घडले आहे ,असं घडायला नको होत .. पण अजूनही वेळ गेलेली नाही आहे .खरी शिवसैनिक म्हणून विनंती करते , आधीच शिवसैनिक संतापले आहेत त्यात खिंडार वगैरे बोलून अजून दारी नको निर्माण करायला "या पद्धतीने किशोरी पेडणेकर यांनी सुद्धा आपली स्पष्ट प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
मुंबईतील पावसाच्या पाण्याच्या निचऱ्याबाबतची समस्यांवर बोलताना महापालिकेने मागील वर्षी केलेल्या कामानुसार थोडा वेळासाठी जरी पाणी तुंबले तरी पाण्याचा निचरा होईल त्याचबरोबर मुंबईच काम आणि मुंबईची सुरक्षा सर्वांनी मिळून करायची आहे आणि ते आम्ही करणार असल्याचं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.त्याचबरोबर संजय राऊत यांच्या वक्तव्यांबद्दल बोलताना ,'संजय राऊत अडीच वर्षांपूर्वीही बोलत होते पण त्यावेळी कधी वाईट वाटलं नाही ,पण आता हे फक्त निम्मित मानावं लागेल.' असं स्पष्टीकरण शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर यांनी दिले .