या राज्यांमध्ये महिला मुख्यमंत्री बनल्या ,पण महाराष्ट्रात कधी ?

Update: 2023-05-11 11:00 GMT


मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी राज्यात चढाओढ सुरू असताना ,एक गोष्ट मात्र नेहमीच खटकते आहे. ती म्हणजे महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याला महिला मुख्यमंत्री म्हणून कधी भेटणार ? गेली कित्येक वर्ष महाराष्ट्र सारख्या पुरोगामी राज्यात मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी राजकारण रंगताना दिसलं आहे. पण या राजकीय कारकिर्दीत अनेक महिलांनी सुद्धा स्वतःचं कर्तृत्व आणि स्वतःची बौद्धिकता जपत महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. पण आजही मुख्यमंत्री पदासाठी कोणताच पक्ष महिलांची नावे जाहीर करताना दिसत नाही. तसेच याच राजकीय वर्तुळातील महिलांना मुळात मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे का ? हा प्रश्न निर्माण होताना दिसत आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर सर्वांच्या नजरा होत्या . शिंदे गटाकडे की उद्धव ठाकरे गटाकडे निकालाचं झुकतं माप असेल याबाबत अनेकांनी अंदाज सुद्धा बांधले होते . पण यामध्ये महिला मुख्यमंत्री व्हावी , अशी पुसटशी जाणीव सुद्धा कुठे दिसली नाही .महाराष्ट्र सोडता भारतातील इतर राज्यात महिला मुख्यमंत्री होऊन गेल्या आहेत . तर महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री कधी मिळणार? हा प्रश्न आजही उभा ठाकला आहे .

या आहेत आत्तापर्यंतच्या इतर राज्यातील महिला मुख्यमंत्री

सुचेता कृपलानी: त्या भारतीय राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या आणि 1963 ते 1967 पर्यंत त्यांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री म्हणून काम केले.


 नंदिनी सत्पथी: त्या ओडिशाच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या आणि 1972 ते 1976 पर्यंत त्यांनी काम केले.

शशिकला काकोडकर: त्या गोव्याच्या पहिल्या आणि एकमेव महिला मुख्यमंत्री होत्या आणि 1973 ते 1979 पर्यंत त्यांनी काम केले.

जे. जयललिता: 1991 ते 1996, 2001 ते 2002, 2002 ते 2006, 2011 ते 2014, 2015 ते 2016 आणि 2016 पर्यंत 206 मध्ये तिचा मृत्यू होईपर्यंत त्यांनी सहा वेळा तमिळनाडूच्या मुख्यमंत्री म्हणून काम केले.

राबडी देवी: 1997 ते 2005 पर्यंत त्यांनी बिहारच्या मुख्यमंत्री म्हणून काम केले.

अन्वारा तैमूर :206 दिवस आसामच्या मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले .

सुषमा स्वराज: त्यांनी 1998 मध्ये दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून काही काळ काम केले.

वसुंधरा राजे : 2003 ते 2008 आणि 2013 ते 2018 या काळात त्यांनी राजस्थानच्या मुख्यमंत्री म्हणून काम केले.

उमा भारती : २५९ दिवसांसाठी मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले .

मायावती: त्यांनी चार वेळा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री म्हणून काम केले - 1995 ते 1997, 2002 ते 2003, 2007 ते 2012 आणि 2012 ते 2017.

शीला दीक्षित: त्यांनी 1998 ते 2013 पर्यंत सलग तीन वेळा दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून काम केले.

ममता बॅनर्जी: त्या पश्चिम बंगालच्या विद्यमान मुख्यमंत्री आहेत आणि 2011 पासून या पदावर आहेत.

आनंदीबेन पटेल: त्यांनी 2014 ते 2016 पर्यंत गुजरातच्या मुख्यमंत्री म्हणून काम केले.

मेहबूबा मुफ्ती: त्यांनी 2016 ते 2018 या काळात जम्मू आणि काश्मीरच्या मुख्यमंत्री म्हणून काम केले आहे .

इतक्या राज्यात महिलांनीच नेतृत्व केलं आहे,तर मग महाराष्ट्र कधी पुढाकार घेणार ? तुम्हला काय वाटतं प्रतिसाद नक्की कळवा .

Tags:    

Similar News