महाविकास आघाडीचे काय होणार?
महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर आता पुढे महाविकास आघाडीचे काय होणार? नवीन विरोधीपक्षनेता कोण असणार? या चर्चा सुरू झाल्या आहेत.
सर्वोच्च न्यायालायच्या निकालानंतर उध्दव ठाकरे यांनी राजीनामा दिला. शिंदे यांच्या बंडामुळे राज्यातील ठाकरे सरकार अस्थिर झाले होते. तर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना बहुमताची चाचणी करण्याचे आदेश दिले होते. त्याविरोधात ठाकरे सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देत ठाकरे बहुमत चाचणीला स्थगिती देण्यास नकार दिला. त्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राजीनामा दिला. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले आहे.
आता भाजपकडून सत्ता स्थापनेसाठी आजच दावा केला जाऊ शकतो अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. याच बरोबर येत्या दोन ते तीन दिवसात देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आल्याच म्हंटल जात आहे. याच चर्चेबरोबर आता महाविकास आघाडीचे काय होणार? महाविकास आघाडी पुढील काळात देखील एकत्र राहणार का? हा देखील प्रश्न आहे. महाविकास आघाडीचे काय होणार याविषयी बोलताना काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी "याविषयी आज बोलणं योग्य नसल्याचं" म्हंटल आहे. त्याच बरोबर महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी आजपासून आम्ही विरोधीपक्षाच्या भूमिकेत दिसणार असल्याचं म्हंटल आहे. त्यामुळे आता नवीन विरोधीपक्ष नेता कोण असणार याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष लागले आहे.
याच सगळ्या सोबत नवीन मंत्रिमंडळात देवेंद्र फडणवीस व शिंदे गटाकडे कोणती मंत्रीपदे राहतील याबाबत या दोन्ही गटात प्राथमिक बोलणी झाली असतीलच पण सुरुवातीला पहिल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदासाठी व त्यांचासोबत काही निवडकच मंत्री शपथ घेतील असं देखील म्हंटल जात आहे.