मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल सभागृहात भाषण करत असताना अचानक भावुक झाले. त्यांच्या कुटुंबासोबत घडलेला प्रकार आठवत त्यांना भर सभागृत अश्रू अनावर झाले. "माझी दोन मुलं डोळ्यासमोरुन गेली. माझं कुटुंब उद्धवस्त झालं होतं. कशासाठी जगायचं आणि कुणासाठी जगायचं? मी ठरवलं होतं, माझा मुलगा श्रीकांत आणि पत्नी, आई-वडील यांच्यासाठीच जगतो. पण त्या दु:खातून आनंद दिघे यांनी मला सावरलं." ही घटना त्यांनी सभागृत सांगितली. त्यानंतर आपल्या कुटुंबाला वेळ देता येत नसल्याची खंत देखील त्यांनी बोलून दाखवली. त्यामुळे जितका वेळ शिंदे यांना मिळतो त्या वेळात ते आपल्या नातवासोबत रमतात हे आपण अनेकवेळा पाहिले आहे. याचाच प्रत्यय काल आला. शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच घरी गेले आणि घरी जाताच त्यांनी आपल्या चिमुकल्या नातवाला कडेवर घेतलं. आणि या चिमुकल्याने सुद्धा आपल्या मुख्यमंत्री आजोबांचे अगदी भन्नाट स्वागत केले.
मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे काल ठाण्यात आले ठाण्यात त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. मागच्या पंधरा दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे नॉटरिचेबल अशी एक बातमी आली आणि त्यानंतर आज पर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नाट्यमय प्रसंग पाहण्यास मिळाले. या सगळ्या घडामोडी झाल्यानंतर अखेर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री. हे सगळं करण्यासाठी एकनाथ शिंदे व बंडखोर आमदार पहिला मुंबईहून सुरतला तिथून थेट गुहाटीला गेले. इथेच हा प्रवास थांबला नाही तर गुवाहाटी वरून ते गोव्याला आले आणि मग मुंबईत. मुंबईत आल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र मुंबईत येऊन देखील त्यांना ठाण्यात जात आलं नाही. तिथून ते पुन्हा गोव्याला गेले. आणि आपल्या सोबत असलेल्या सर्व आमदारांसह पुन्हा मुंबईत आले. मुंबईतलं दोन दिवसाचं अधिवेशन संपलं. बहुमत चाचणीत शिंदे-फडणवीस सरकार पास झालं आणि त्यानंतर एकनाथ शिंदे काल ठाण्यात आले. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे पहिल्यांदाच आपल्या ठाण्यात आल्यानंतर त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आले.
ठाण्यात एकनाथ शिंदे यांचे जल्लोषात स्वागत सुरू असताना सर्वात चर्चा होती ती म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या नातवाने त्यांच्या केलेल्या स्वागताची. मुख्यमंत्री काल संध्याकाळी जेव्हा त्यांच्या ठाण्यातील घरी आले त्यावेळी घरात प्रवेश करताच त्यांनी पहिला आपल्या चिमुकल्या नातवाला उचलून घेतलं यावेळी नातवाने आजोबांना नाम ओढत भन्नाट असे स्वागत केले. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहायला मिळाला.
मुख्यमंत्री झाल्यानंतर घरी येताच आपल्या नातवाने केलेल्या स्वागताचे फोटो आता समाजमाध्यमांवर व्हायरल होतं आहेत.