पुढील लोकसभा निवडणूकीत बारामतीवर आमचं वर्चस्व; भाजपच्या "मिशन"ला महादेव जानकरांची साथ

Update: 2022-08-07 12:51 GMT

गेल्या अनेक वर्षांपासून बारामती मतदारसंघातून शरद पवार हे लोकसभेवर निवडून येतात, परंतू बारामतीचा विकास अद्याप ही झाला नाही.

बारामती मतदारसंघातील ७५ टक्के विकास झाला नाही, असे महादेव जानकारांनी वक्तव्य केले आहे. जानकरांच्या वक्त्याव्यामुळे राजकीय चर्चांना आता उध्दान आले आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी भाजप गटात प्रवेश केल्यानंतर आगामी लोकसभेवर वर्चस्व मिळवण्यासाठी बारामती मतदारसंघावर आपलं वर्चस्व निर्माण करण्यासाठी भाजपने महादेव जानकार यांना मदतीला घेतले आहे. राज्याच्या राजकारणात गेल्या अनेक वर्षापासून बारामती मतदार संघातून निवडणूक लढवण्याचे वक्तव्य महादेव जानकर करत होते. अश्यातचं केंद्रीयमंत्री निर्मला सितारामन बारामतीच्या असल्याने चर्चेला उधाण आले आहे. महादेव जानकरांनी योग्य प्लँनिंग केले असले तर राष्ट्रवादीला परावभ स्विकारावा लागेल असा विश्वास भाजपने व्यक्त केला आह. बारामती लोकसभेत एका बाजूला धरण आणि दुसर्या बाजूला लोकांच्या घशाला कोरड अशी अवस्था निर्माण झाली आहे.

बारामतीतील २६ गावांचा प्रश्न तर इंदापूर तालुक्यातील ३२ गावांचा प्रश्न आज ही प्रलंबीत आहे आता जर निर्मला सितारामन यांनी बारामतीच्या जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष दिलं तर त्यांचे अभिनंदन आहे असे जानकर म्हणाले बारामतीतील जनतेचे माझ्यावर उपकार आहेत त्यांनी मला साडेपाच लाख मत दिली. भाजप हा मोठा पक्ष आहे. त्यांनी मला मार्गदर्शन करायला हवे. शरद पवारांच्या कोणत्याही राजकीय पक्षाने बळी पडू नये. यापूर्वीचा इतिहास पाहीला तर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना देखील पराभव स्विकारावा लागला होता. त्यामुळे शरद पवारांच्या मतदारसंघात विजय मिळवणं अशक्य असं काहीचं नाही. भाजपाने एकाच व्यक्तीवर लक्ष केंद्रीत केले तर भाजपाला ईतर राजकीय पक्षावर वर्चस्व मिळावायला वेळ लागणार नाही असे जानकरांनी मत व्यक्त केले आहे.

Tags:    

Similar News