उर्मिला मातोंडकर कॉंग्रेसवर नाराज आहेत का?

Update: 2020-11-02 11:39 GMT

सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात राज्यपाल नियुक्त आमदाराची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? याची चांगलीच चर्चा सुरु आहे. त्यातच एकनाथ खडसे आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांची नाव आघाडीवर आहे. अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिला कॉंग्रेसकडून विधानपरिषदेवर संधी दिली जाणार अशी चर्चा सुरु असताना शिवसेनेने देखील उर्मिला मातोंडकर ला संधी दिल्याच्या बातम्या येत आहेत.

यातच वडेट्टीवार यांच्या विधानाने उर्मिला मातोंडकर चं नाव कॉंग्रेसच्या यादीत नसल्याचं समोर आलं आहे.  या संदर्भात बोलताना वड्डेटीवार म्हणाले... प्रत्येकाला आपला राजकीय निर्णय घेण्याचा अधिकार असतो. उर्मिला यांनी शिवसेनेची ऑफर स्विकारली असावी, कोणी कोणत्या पक्षाकडून उमेदवारी मिळवावी. हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. काँग्रेसनेही उर्मिला यांना विधानपरिषदेसाठी उमेदवारी देऊ केली होती. परंतु तेव्हा त्यांनी स्पष्ट नकार दिला होता. त्या राज्यसभेच्या उमेदवारीसाठी इच्छुक आहेत.'

असं म्हणत त्यांनी उर्मिला मातोंडकर यांच्य़ा उमेदवारी बाबत नवा गौप्यस्फोट केला आहे. मात्र, राज्यसभेसाठी इच्छूक असणाऱ्या उर्मिला ने शिवसेनेकडून आलेली ऑफर का स्विकारली? त्यामुळे उर्मिला मातोंडकर शिवसेनेवर नाराज आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.


Tags:    

Similar News