तोपर्यंत हारतुरे स्विकारणार नाही; पंकजा मुंडेंची घोषणा...
बीड जिल्ह्यात भाजपकडून आयोजित करण्यात आलेल्या 'समर्थ बूथ अभियान' या कार्यक्रमात बोलत असताना पंकजा मुंडे म्हणल्यात;
मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापताना पाहायला मिळत आहे. तर याच मुद्यावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहे. असे असताना अरक्षणाच्या मुद्यावर बोलताना भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी एक घोषणा केली असून,"मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय मार्गी लागेपर्यंत हारतुरे स्विकारणार नाही," असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.
बीड जिल्ह्यात भाजपकडून आयोजित करण्यात आलेल्या 'समर्थ बूथ अभियान' या कार्यक्रमात बोलत असताना पंकजा मुंडे म्हणल्यात, "मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय मार्गी लागत नाही तोपर्यंत हारतुरे स्विकारणार नाही. तर ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न निकाली लागत नाही तोपर्यंत फेटा बांधणार नाही, असे म्हणाल्या.
लिंक...
ओबीसी अरक्षणाची लोकसभेत बाजू मांडताना भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून केलेल्या काही विधानामुळे त्यांच्यावर टीका होत आहे. त्यांनतर आता पंकजा मुंडे यांनी जाहीर केलेली भूमिका,त्यामुळे पुन्हा एकदा अरक्षणाच्या मुद्यावरून आरोप-प्रत्यारोप होण्याची शक्यता आहे.