दिशा सालियन मृत्यू प्रकरणानंतर उध्दव ठाकरे यांचा दोन वेळा फोन; नारायण राणे यांचा गौप्यस्फोट
दिशा सालियन मृत्यू प्रकरणात वादग्रस्त वक्तव्य केल्याने केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांनी मालवणी पोलिस ठाण्यात चौकशीठी हजर होते. यावेळी चौकशीनंतर बाहेर आल्यानंतर नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे नाव घेत मोठा गौप्यस्फोट केला.
राज्यात भाजप विरुध्द महाविकास आघाडी सामना रंगला आहे. त्यातच शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेनंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत दिशा सालियनचा मृत्यू इमारतीवरुन पडून नाही तर बलात्कार करून तिचा खून करण्यात आल्याचा आरोप नारायण राणे यांनी केला होता. त्यानंतर राणे यांनी सालियन कुटूंबियांची बदनामी केल्याचा आरोप करत मालवणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे शनिवारी नारायण राणे आणि नितेश राणे हे मालवणी पोलिस ठाण्यात चौकशीसाठी हजर राहिले होते. यावेळी झालेल्या चौकशीनंतर नारायण राणे यांनी दिशा सालियन मृत्यू प्रकरणानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दोन वेळा फोन केल्याचा गौप्यस्फोट नारायण राणे यांनी केला.
दिशा सालियन मृत्यू प्रकरणात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी खळबळजनक आरोप केले होते. त्यामध्ये दिशा सालियनवर सामुहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप राणे यांनी केला होता. त्यामुळे राज्याचे राजकारण तापले होते. तर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सालियन कुटूंबियांची भेट घेतली होती. त्यानंतर किशोरी पेडणेकर यांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली. त्यामुळे राज्य महिला आयोगाने दिशा सालियन मृत्यू प्रकरणात मालवणी पोलिसांकडे दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा अहवाल मागवला होता. मात्र त्यामध्ये दिशा सालियनवर बलात्कार करून हत्या केल्याचा कोणताही पुरावा आढळला नाही. त्यामुळे नारायण राणे आणि नितेश राणे यांच्याविरोधात मालवणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याप्रकरणी नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांची शनिवारी चौकशी झाली.
केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांनी दिशा सालियनच्या कुटूंबियांची बदनामी केल्याप्रकरणी मालवणी पोलिस ठाण्यात चौकशीसाठी हजर होते. यावेळी तब्बल नऊ तास राणे पिता पुत्रांची चौकशी झाली. त्यानंतर राणे यांनी बाहेर येऊन मोठा गौप्यस्फोट केला.
यावेळी राणे यांनी म्हटले की, दिशा सालियनच्या मृत्यूनंतर राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मला दोन वेळा फोन करुन दिशाच्या आणि सुशांतच्या केसबद्दल बोलू नका. मंत्र्याची गाडी होती याचा उल्लेख करू नका, अशी विनंती उध्दव ठाकरे यांनी केली होती. यावर मी म्हणालो की असं का बोलायचं नाही. आम्ही लोकप्रतिनिधी आहोत. त्यावेळी मुख्यंमत्री म्हणाले, नाही तुम्हीला देखील मुलं आहेत. त्यामुळे तुम्ही असं करु नका, असा गौप्यस्फोट केला. तर माझ्या जबाबातून वरील वाक्य वगळण्यात आल्याचा आरोपही राणे यांनी केला. त्यामुळे ही आजची केस राजकीय हेतूने प्रेरीत आहे, असे मत राणे यांनी व्यक्त केले.
दिशा सालियन मृत्यू प्रकरणी नारायण राणे आणि नितेश राणे यांनी आरोप करताना दिशा सालियनवर बलात्कार झाल्याचा आरोप केला होता. तर त्यानंतर सुशांत सिंह राजपूतचीही हत्या करण्यात आली होती. त्याप्रकरणात शिवसेनेच्या मंत्र्याची गाडी होती, असा आरोप राणे यांनी केला होता. त्यानंतर दिशा सालियन कुटूंबियांची बदनामी केल्याप्रकरणी राणे त्यांची नऊ तास चौकशी झाली. त्यानंतर राणे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे नाव घेत मोठा गौप्यस्फोट केला.