लखीमपूरमधील हिंसाचाऱ्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. तर याच बंदला मात्र भाजपकडून विरोध करण्यात येत असून, महाराष्ट्र बंदला जनता जुमानणार नाही अशी टीका भाजप नेत्या आणि केंद्रीय मंत्री भारती पवार यांनी केली आहे.
टीव्ही 9 मराठीने दिलेल्या वृत्तानुसार भारती पवार यांनी टीका करतांना म्हंटले आहे की, महाराष्ट्रातल्या व्यापाऱ्यांच्या, शेतकर्यांच्या वेदना समजून घ्यायला राज्य सरकारला वेळ नाही, पण शेजारच्या राज्यात घटना घडली तर त्याचं राजकारण करून हा बंद पुकारला गेला असून, या बंदचा मी निषेध करते. या बंदला जनता जुमानणार नाही. राज्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जात नसल्याचा आरोप पवार यांनी केला. त्यामुळे आधी महाराष्ट्राचे प्रश्न सोडवा, असा सल्ला ही सुध्दा यावेळी केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांनी ठाकरे सरकारवर दिला.
तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्विट करत,कोणी मला अपडेट देऊ शकेल का?, आज वसुली चालू आहे की बंद?,असा खोचक टोला महाविकास आघाडी सरकारला लगावला होता.