अखेर उमेदचे आंदोलन मागे..

Update: 2020-12-17 10:00 GMT

आझाद मैदान याठिकाणी ग्रामीण विकास संदर्भातील उमेद प्रकल्पाच्या कर्मचारी त्याचबरोबर बचत गटाच्या काम करणाऱ्या समूह संघटिका यांनी धरणे आंदोलन केले होते. या संदर्भात बोलताना विधान परिषदेच्या उप सभापती निलम गोऱ्हे म्हणाल्या की, "केंद्राच्या सूचनेनुसार एका कंपनीला उमेदचे सर्व काम सोपवला जाणार होते. याला सर्व वरिष्ठ स्तरावरच्या कर्मचाऱ्यांचा विरोध आहे. बैठकीमध्ये त्यांच्या मागणीनुसार केंद्राच्या या सुचनेतून कंपनीला वगळण्याचा निर्णय ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आमच्या सूचनेनुसार जाहीर केलेला आहे."

दरम्यान, राज्यातील उमेद अभियानाचे त्रांगडे वाढत चालले आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यासोबत लाखो महिला बचत गटांच्या आर्थिक उलाढालीवर त्याचे सावट येत आहे. राज्य सरकारने या अभियानातील कंत्राटी कर्मचारी कामवरून काढून टाकले आहेत. हे अभियान त्रयस्थ संस्थेच्या हाती देण्याच्या निर्णयदेखील पूर्णपणे अंमलात आलेला नाही. त्यामुळे राज्यातील बेरोजगार झालेल्या दोन हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानावर आंदोलन केले हेते.

Tags:    

Similar News