उध्दव ठाकरे यांना पालिका रुग्णालयाच्या परिचारीकांनी बांधली राखी

Update: 2022-08-10 12:49 GMT

बहीण भावा मधील अतूट नात्याला रेशमाच्या धाग्याने बळकटी मिळवून देणारा सण म्हणजे रक्षाबंधन. हा सण श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण म्हणून साजरा केला जातो. गुरुवार, ११ ऑगस्ट २०२२ रोजी रक्षाबंधन हा सण संपुर्ण देशभरात साजरा केला जाणार आहे. बहीण या दिवशी भावाला ओवाळून त्याचा हातावर राखी बांधते. हाच धागा म्हणजे बहीणीच्या आयुष्यभराच संरक्षण करण्याच वचन हे रक्षाबंधन दिनी दिल जातं. अशातच आज राज्याचे माजी मुख्यंमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना पालिकेतील रुग्णालयाच्या परिचारीकांनी मातोश्रीवर राखी बांधत रक्षाबंधन साजरा केला.

जगभरात ज्यावेळी कोरोना महामारी संकट होत. त्याच वेळी उध्दव ठाकरे मुख्यमंत्री होते. महाराष्ट्रभरात करण्यात आलेल आरोग्य विभागातील नियोजनामुळे मास्क सक्ती, रुग्णांची उपाययोजना, आरोग्य विभागातील परिचारीकांसह अन्य स्टाफ ची घेण्यात आलेली काळजी याच अनुषंगाने आज बृहन्मुंबई महानगर पालिकेतील रुग्णालयाच्या परिचारीकांनी मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी येथील परिचारीकांनी उध्दव ठाकरे यांना राखी बांधली. कोविड काळात केलेल्या सहकार्याबद्दल या परिचारीकांनी उध्दव ठाकरे यांचे आभार मानत त्यांच्या भावना व्यक्त केल्या. यावेळी असंख्य पदाधिकारी, शिवसैनिक तसेच महानगर पालिकेच्या परिचारीका उपस्थित होत्या.

Tags:    

Similar News