" एकनाथ शिंदे जी.." उद्धव ठाकरे यांचे ट्विट..
एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून काल शपथ घेतील. एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी करताच उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे.
एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून काल संध्याकाळी शपथ घेतली. मागच्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बाहेर पडत बंड केले होते. या बंडा नंतर उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला त्यानंतर राज्यात देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री होतील अशी चर्चा होती. मात्र एकनाथ शिंदे गुवाहाटी वरून काल गोव्याला आणि गोव्यावरून थेट ते आज मुंबईला आले. मुंबईला आल्यानंतर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राज्यपालांची भेट घेतली आणि त्यानंतर या दोघांनी एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी भाजप शिंदे गटाला पाठिंबा देत असून एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असतील असं जाहीर केलं. आणि यानुसार काल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. महाराष्ट्रात हे नवीन सरकार आल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल संध्याकाळी ट्विट करत शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी म्हंटल आहे की, "महाराष्ट्र राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांना भावी वाटचालीस शुभेच्छा. आपल्या हातून महाराष्ट्रामध्ये चांगले काम होवो, ही सदिच्छा!
महाराष्ट्र राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री @mieknathshinde जी व उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी यांना भावी वाटचालीस शुभेच्छा. आपल्या हातून महाराष्ट्रामध्ये चांगले काम होवो, ही सदिच्छा!
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) June 30, 2022
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्य सरकार अल्पमतात आले होते. तर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उध्दव ठाकरे यांना बहूमताची चाचणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर त्याच दिवशी उध्दव ठाकरे यांनी राजीनामा दिला. मागच्या काही दिवसांपासून शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे राज्याच्या राजकारणात अस्थिरता निर्माण झाली होती. एकनाथ शिंदे यांनी बंड करत चाळीसहून अधिक आमदार सुरुवातीला सुरत आणि त्यानंतर गुवाहाटीला घेऊन जात बंड केला. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले होते आणि या सगळ्या राजकीय नाट्यानंतर आज राज्यपाल भगतसिंग कोशारी फ्लोर टेस्ट करण्याचे निर्देश दिले. राज्यपालांच्या या निर्णयानंतर महाविकास आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सायंकाळी पाच वाजता सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला आणि 30 तरखेलाच बहुमत चाचणी घेण्यावर सर्वोच्च न्यायालय सुद्धा ठाम राहिले. या निकालानंतर काही वेळातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.या राजकीय नाट्यानंतर एकनाथ शिंदे गुहाटी वरून गोवा मार्गे आज मुंबई मध्ये आले आणि मुंबईमध्ये येतात त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन थेट राजभवन गाठले. त्यानंतर एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्या झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही शिंदे गटाला पाठिंबा देत असून एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होतील अशी घोषणा केली. व काल एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.