Twitter वर तू तू मैं मैं : पंकजा मुंडे v/s धनंजय मुंडे

बीडमध्ये वाढती करोना रुग्णसंख्या आणि लसींचा तुटवडा यावरून बहिण-भावात ट्विटर वॉर सुरु.

Update: 2021-04-16 12:38 GMT

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक पक्षाचे नेते आपण कशाप्रकारे जनतेची मदत करत आहोत. हे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. विरोधी पक्षातील लोक मागणी करत आहेत. तर सत्ताधारी त्यांना उत्तराचे शाब्दीक टोले देऊन उत्तर देत आहे.



बीड जिल्ह्यातही हिच परिस्थिती आहे. बीड जिल्हा हा राजकारण्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. बहिण भावाचं राजकारण इथं पाहायला मिळतं. त्यामुळं पंकजा मुंडेंनी काही म्हटलं तर धनंजय मुंडेंनी त्याला उत्तर दिलंच पाहिजे. धनंजय मुंडेंनी काही म्हटलं तर पंकजा त्यांना उत्तर देतात. हे नेहमी पाहायला मिळतं. मात्र, आता या या दोघांचं राजकीय वैर थेट शरद पवार, पंतप्रधान नरेंद्र मोदी पर्यंत जाऊन पोहोचलं आहे.



आता झालंय असं की, कोरोनाचा वाढता प्रार्दुभावानं बीड जिल्ह्यातील परिस्थिती गंभीर होत आहे. त्यामुळं जिल्ह्यात रेमडेसिवीर आणि लसींचा तुटवडा निर्माण होत असल्याचं पत्र भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना लिहिलं. हे पत्र त्यांनी आपल्या ट्वीटवर ट्वीट केलं.
ट्वीट करताना धनंजय मुंडे यांना डिवचायचं त्या विसरल्या नाहीत…

#REMDESIVIR चा तुटवडा बीडमध्ये जाणवत आहे, आरोग्य मंत्री यांना विनंती आहे जातीने लक्ष घालून उपलब्ध करून द्यावे. राज्य सरकारला आलेल्या 2 लाख पैकी बीड ला ही पुरेसे #vaccine मिळाले पाहिजेत. बीडच्या सत्ताधाऱ्यांना माफियांचे हित माहिती आहे जनतेच्या हितासाठी आम्ही लढण्यास तयार आहोत.

https://twitter.com/pankajamunde/status/1382769237672947713?s=24

यावेळी पंकजा मुंडे यांनी बीडच्या सत्ताधाऱ्यांना माफियांचे हित माहिती आहे. जनतेच्या हितासाठी आम्ही लढण्यास तयार असल्याचा अप्रत्यक्षपणे टोला सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना ट्विटरच्या माध्यमातून लगावला आहे.

दरम्यान त्यांच्या या पत्रावरुन धनंजय मुंडे यांनी ट्वीट करत उत्तर दिलं आहे.

"ताईसाहेब, मुख्यमंत्र्यांना व आरोग्यमंत्र्यांना पत्र लिहिण्याऐवजी पूर्ण माहिती घेऊन एखादे पत्र पंतप्रधानांना पाठवावे व लसींचा पुरवठा वाढविण्याबाबत आग्रह धरावा, जेणेकरून कोरोनाविरुद्धच्या या लढाईत खरोखरच आपली मदत होईल," असा टोला धनंजय मुंडे यांनी ट्वीट करत लगावला आहे.

काय म्हटलंय धनंजय मुंडे यांनी…

ताई साहेब, मा. मुख्यमंत्र्यांना व मा. आरोग्य मंत्र्यांना पत्र लिहिण्याऐवजी पूर्ण माहिती घेऊन एखादे पत्र मा. पंतप्रधानांना पाठवावे व लसींचा पुरवठा वाढविण्याबाबत आग्रह धरावा, जेणेकरून कोरोनाविरुद्धच्या या लढाईत खरोखरच आपली मदत होईल! जिल्ह्यात लसीकरणाचे दोन्ही कंपन्यांचे मिळून 149473 नागरीकांना पहिले तर 19732 नागरिकांना दुसरे डोस देण्यात आले आहेत.हे प्रमाण अन्य जिल्ह्याच्या सरासरीच्या तुलनेत अधिक आहे, हेही आपल्याला ज्ञात नसेलच! राजकारण इतरत्र जरूर करा,पण कृपया जिथे लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे तिथं नको. जिल्ह्यात कोव्हिशिल्डचे 6800 व कोव्हॅक्सिनचे 13290 डोस शिल्लक आहेत व कोव्हॅक्सिन केवळ दुसऱ्या डोससाठीच वापरावे असे केंद्राचे निर्देश आहेत. ऑक्सिजन, रेमडीसीवर तसेच लसीकरण यापैकी कोणत्याही उपाययोजनेत अडसर येऊ नये यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. बीड जिल्ह्यात सध्या दुसऱ्या डोससाठी कोव्हॅक्सिनचे 13290 डोस शिल्लक आहेत. तसेच हा स्टॉक संपायच्या आत आणखी दोन दिवसांनी पुढील स्टॉक येईलच, हेही काहींना माहीत नसावं. पण आपल्या अचानक आलेल्या जागृतीतून जनतेमध्ये संभ्रम निर्माण होत असून त्याचा परिणाम लसीकरण प्रक्रियेवर देखील होऊ शकतो. अनेक महिने विश्रांतीनंतर अचानक जाग आली की बाहेरच्या अनेक गोष्टीची माहितीच नसते. केंद्राने राज्याला दिलेल्या 2 लाख लसी या कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या डोससाठी आहेत,त्यामुळे शिल्लक लसींची माहिती घेऊन त्याप्रमाणात सर्व जिल्ह्यांना लसी वाटण्यात आल्या.हे काहींना ज्ञात नसेल.

https://twitter.com/dhananjay_munde/status/1382950984297553922

धनंजय मुंडे यांच्या ट्वीट नंतर शांत बसतील तर त्या पंकजा कशा? धनंजय मुंडेंच्या ट्वीटचा स्क्रीनशॉट घेत पंकजा मुंडे यांनी त्यांना चांगलचं उत्तर दिलंय...

राज्याच्या भल्ल्यासाठी PM जिल्ह्याचा CM आणि पवार साहेबांना ही पत्र लिहीन दखल ही घेतली जाईल! तुम्ही त्यांनी दिलेल्या संधीचा तरी सन्मान करा. तुम्ही बीडमध्ये दमडीही आणली नाही,माफिया मात्र आणले जुन्या निधीचे काम तरी करा, उद्धाटन करा हक्क तुम्हाला आहेच भाऊ!

https://twitter.com/pankajamunde/status/1382973963697934342?s=24

असं सडेतोडउत्तर पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना दिलं आहे.

Tags:    

Similar News