एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्य सरकार अल्पमतात आले होते. तर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उध्दव ठाकरे यांना बहूमताची चाचणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आता उध्दव ठाकरे यांनी राजीनामा दिला आहे. मागच्या काही दिवसांपासून शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे राज्याच्या राजकारणात अस्थिरता निर्माण झाली होती. एकनाथ शिंदे यांनी बंद करत चाळीसहून अधिक आमदार सुरुवातीला सुरत आणि त्यानंतर गुवाहाटीला घेऊन जात बंड केला. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले होते आणि या सगळ्या राजकीय नाट्यानंतर आज राज्यपाल भगतसिंग कोशारी फ्लोर टेस्ट करण्याचे निर्देश दिले. राज्यपालांच्या या निर्णयानंतर महाविकास आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सायंकाळी पाच वाजता सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला आणि 30 तरखेलाच बहुमत चाचणी घेण्यावर सर्वोच्च न्यायालय सुद्धा ठाम राहिले. या निकालानंतर काही वेळातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. राज्याच्या राजकारणात एकीकडे या घटना घडत असताना समाज माध्यमांवर सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या शेअर केलेल्या फोटोंची जोरदार चर्चा होती.
काल सुप्रिया सुळे यांनी त्यांची दोन मुले व त्यांच्या पतीसोबत वाढदिवस साजरा केला आहे. त्यांनी त्यांच्या वाढदिवसाचे केक कापत असतानाचे फोटो समाज माध्यमांवर शेअर केले आहेत. फोटो शेअर करत त्यांनी म्हंटले आहे की, "Blessed! My Kids - My Joy, My Happiness, My Strength and My Weakness 💞" एकीकडे महाविकास आघाडी सरकार कोसळत असताना सुप्रिया सुळे यांनी केक कापत साजरा केलेल्या या वाढदिवसामुळे समाज माध्यमांवर जोरात चर्चा सुरू आहे.
त्यानंतर आज सकाळी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी सुद्धा सुप्रिया सुळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी ट्विट करता म्हंटल आहे की, संसदरत्न खासदार सौ. सुप्रिया सुळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...! आपणास उदंड आयुष्य लाभो हीच सदिच्छा..!
संसदरत्न खासदार सौ. सुप्रिया सुळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...! आपणास उदंड आयुष्य लाभो हीच सदिच्छा..!@supriya_sule pic.twitter.com/e3gs5Wocbm
— Narhari Zirwal (@Narhari_Zirwal) June 30, 2022