"CM सहाब आप तो आगे पीछे उपर निचे देख रहे थे, हमे तो आपमे बेशर्म आदमी देखा"

खासदार महुआ मोइत्रा यांनी केली उत्तराखंडचे मुख्यमंत्री तिर्थ सिंह रावत यांची कान उघडणी;

Update: 2021-03-18 10:00 GMT

उत्तराखंडचे मुख्यमंत्री तिर्थ सिंह रावत यांनी महिलांच्या पोशाखांबाबत केलेल्या विधानावरून वाद वाढला आहे. यावर आता राजकीय प्रतिक्रियाही उमटू लागल्या आहेत. तृणमूल कॉंग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी तीरथसिंग रावत यांच्या विधानावर त्यांची चांगलीच फिरकी घेतली आहे.

महुआ मोईत्रा यांनी ट्वीट करत "उत्तराखंडचे मुख्यमंत्री म्हणतात, जब नीचे देखा तो गमबूट था.. और उपर देखा तो.. एनजीओ चलाती हो आणि घुटने फटे दिखते है? मुख्यमंत्री साहेब - जबा आपको देखा तो ऊपर-नीचे-आगे-पीछे हमे सिर्फ बेशर्म - बेहुदा आदमी दिखता है" अशी जळजळीत प्रतिक्रिया महुआ मोईत्रा यांनी व्यक्त केलीय.

Tags:    

Similar News