'अंकल जी' अपने पूरे गांव और खानदान को राजभवन में ले आए हैं
खासदार महुआ मोइत्रा आणि पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांच्यात ट्वीटर वॉर;
ममता बॅनर्जी यांची महिला ब्रिगेड आणि भाजप नेते यांच्यात नेहमीच वाद सुरु असतात. यात एक नाव नेहमी आघाडीवर असतं ते म्हणजे खासदार महुआ मोइत्रा. महुआ मोइत्रा सध्या चर्चेत आल्या आहेत ते राज्यपाल जगदीप धनखड यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे.
झालं असं की, टीएमसीच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी राज्यपाल जगदीप धनखड यांना 'अंकल जी' म्हणत राज्यपालांनी त्यांचे OSD म्हणून आपल्याच कुटुंबातील लोकांना नियुक्त केल्याचा आरोप केला आहे. मोईत्रा यांनी ट्विटरवर एक यादी शेअर केली असून, ज्यात राज्यपालांचे ओएसडी अभ्युदय शेखावत, ओएसडी-कोऑर्डिनेशन अखिल चौधरी, ओएसडी-प्रशासन रुचि दुबे, ओएसडी-प्रोटोकॉल प्रशांत दीक्षित, ओएसडी-आयटी कौस्तव एस वलीकर आणि नवनियुक्त ओएसडी किशन धनखड यांची नावे आहेत.
एवढ्यावरच न थांबता जेव्हा राज्यपाल धनखड यांनी पश्चिम बंगालमधील कायदा व सुव्यस्थेबद्दल चिंता व्यक्त केली तेव्हा मोइत्रा म्हणाल्या की, "अंकलजी, तुम्ही माफी मागून दिल्लीला परत जा आणि दुसरी नोकरी मिळाते का बघा. पश्चिम बंगालमधील 'चिंताजनक परिस्थिती' सुधारेल."