'प्रयोगशाळा म्हणून जम्मू-काश्मीरचा वापर' मेहबूबा मुफ्ती यांची केंद्र सरकारवर टीका...
पंडित जवाहरलाल नेहरू आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्यासारखे नेते हे जम्मू कश्मीर साठी एक धोरण असल्याच देखील ' मेहबूबा मुफ्ती यांनी म्हंटल आहे...
जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी मागच्या काही दिवसांपूर्वीच कश्मीर मध्ये जे 370 कलम हटवले ते असंवैधानिक असल्याची टीका केली होती. त्यानंतर त्यांनी आज पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्यासारखे नेते हे जम्मू कश्मीर साठी एक धोरण होते. पण हे जे मोदी सरकार आहे ते फक्त हिंदू आणि मुस्लिमांमध्ये फूट पाडत आहे. शीख समाजातील किती सरदार हे खालिस्तानी झाले. फक्त आम्हीच पाकिस्तानी झालोय आणि फक्त भाजपाच हिंदुस्तानी आहे. अस म्हणत त्यांनी भाजपवर टीका केली आहे.
सध्या जम्मू-काश्मीरच्या विकासाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आहे. 5 ऑगस्ट 2019 रोजी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत जम्मू काश्मीरला विषेश दर्जा देणारे कलम 370 आणि 35 ए रद्द केले होते. त्यानंतर जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा देण्यात आला. तर जम्मू काश्मीर पासून विभक्त करण्यात आलेल्या लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला. त्यानंतर आता केंद्र सरकार काश्मीर मध्ये पुन्हा निवडणूक घेण्यासाठी सकारात्मक असल्याचे दिसत आहे. कारण आता तिथल्या लोकांसाठी विकासात्मक धोरण कसे राबवता येईल यासाठी मागच्या आठवड्यात 70 मंत्री काश्मीरच्या दौऱ्यावर गेले होते. तिथले प्रश्न जाणून घेण्यासाठी त्यानी हा दौरा केला होता. त्यानंतर आता दिल्ली या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक सर्वपक्षीय बैठक घेतली आणि या बैठकीत सुद्धा कश्मीर मधल्या विकासांच्या धोरणासंदर्भात चर्चा झाली होती. पण या बैठकीत स्थानिक पक्षांचा समाधान झाले असल्याचे म्हटले जात होते.
त्यानंतर आज मेहबूबा मुफ्ती यांनी पत्रकारांशी संवाद साधला व केंद्र सरकारवर टीका केली. यावेळी त्यांनी केंद्र सरकार काश्मीरचा प्रयोगशाळा म्हणून वापर करत असल्याचे म्हंटले आहे.