"हे तिन पायांचं सरकार एकाचा दुसऱ्याशी मेळ नाही"

खासदार पूनम महाजन यांची लोकसभेत महाविकास आघाडी सरकारवर टीका

Update: 2021-03-22 08:51 GMT

माजी मुंबईं पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांच्या लेटरमुळे राज्यात राजकीय वादळ आलं आहे. विरोधी पक्षान राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी केलेय. तर दुसरीकडे हे खंडणी प्रकरण लोकसभेत चर्चेला आल्याले गदारोळ झाला.

संसदेत बोलताना मुंबईच्या भाजप खासदार पूनम महाजन म्हणाल्या की, "राज्यातील ठाकरे सरकार हे तीन चाकी सरकार आहे. या सरकारचा एकाचा दुसऱ्याशी मेळ नाही. एका पोलीस अधिकाऱ्याला 100 कोटी वसूल करण्याचं टार्गेट दिलं जातं. तर पाच वर्षात सहा हजार कोटी वसूल केली जातील. एका व्यक्तीला एवढं टार्गेट तर इतर पोलीस अधिकाऱ्यांना किती असेल? याप्रकरणात राष्ट्रवादीचे गृहमंत्री असताना शिवसेनेला मिर्ची लागण्याचं कारण काय?" असा चिमटाही महाजन यांनी काढला.

Full View


Similar News