बायकांमुळे अडचणीत ठाकरे सरकार

महाविकास आघाडी सरकार केवळ बायकांमुळेच अडचणीत आलंय. दोन महिन्यांत दोन मंत्र्यांचे राजीनामे, या राजीनाम्यांचं श्रेय देवेद्र फडणवीस यांनादिले जात असले तरी या राजीनाम्यांच्या खऱ्या शिल्पकार महिलाच ठरल्या आहेत.;

Update: 2021-04-05 14:45 GMT

अनिल देशमुख यांनी आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता पुढचा नंबर कुणाचा? अशा पोस्ट सध्या सोशल मीडियावर फिरत आहेत. पुढचा नंबर कुणाचा हा पुढचा विषय... पण महाविकास आघाडी अडचणीत सापडण्याची ही पहिलीच वेळ नाहीय. या आधिही काही नेत्यांमुळे सरकार अडचणीत आलंय. तुम्हाला विश्वास नाही बसणार पण... हे सरकार आत्तापर्यंत जेवढ्या वेळा चर्चेत आलं. त्याला कारण केवळ महिला ठरल्या आहेत. आणि, यात राष्ट्रवादीच्या नेत्यांचे प्रमाण अधिक आहे.

आता जरा इस्कटवून पाहू

1) मंत्री धनंजय मुंडे, (राष्ट्रवादी कॉंग्रेस)

सरकारला अडचणीत आणणारे पहिले मंत्री आणि नेते धनंजय मुंडे. आता मुंडेंचा वाद काय होता हे सांगण्याची गरज नाही. पण, तरीही सांगतो.


रेणू शर्मा आणि करुणा शर्मा या दोन बहिणींनी धनंजय मुंडे यांच्यावर लैगीक अत्याचाराचा आरोप केला. यातील करुणा शर्मा यांच्याशी आपले 'परस्पर संमतीने' संबंध असल्याचे मुंडेंनी मान्यसुध्दा केले. या प्रकरणामुळे विरोधकांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. पण ऐनवेळी रेणू शर्मा यांनी आपली तक्रार मागे घेतल्याने विरोधी पक्ष शांत झाला.

2) तत्कालीन वन मंत्री संजय राठोड (शिवसेना)

सरकारला अडचणीत आणणारे पुढचे मंत्री आहेत. तत्कालीन वन मंत्री संजय राठोड. यांना टिकटॉक स्टार पूजा चव्हाणच्या आत्महत्येमुळे राजीनामा द्यावा लागला. पूजाच्या आत्महत्येनंतर माध्यमांत फोन वरील संभाषणाच्या काही ऑडीओ क्लिप व्हायरल झाल्या. त्यातील आवाज हा पूजा आणि संजय राठोड यांचा असल्याचे बोललं गेलं. यातील एका ऑडीओ क्लिपमुळे 'गबरुशेठ' हे नाव चर्चेत आलं.


विरोधकांनी हा मुद्दा उचलला आंदोलने केली. शेवटी संजय राठोड यांना आपल्या वन मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला.

3) गृहमंत्री अनिल देशमुख (राष्ट्रवादी कॉंग्रेस)

आता तुम्ही म्हणाल देशमुखांच्या प्रकरणात कोणती बाई आहे? हे तर परमवीर, वाझे आणि 100 कोटीवालं प्रकरण आहे. पण भावांनो उच्च न्यायालयाने ज्या याचिकेमुळे CBI चौकशीचे आदेश दिले ती परमवीर यांनी नाही तर ॲड जयश्री पाटील यांनी दाखल केली होती. लगा ना शॉक..


आता या जयश्री पाटील कोण आहेत? या संदर्भात आम्ही स्वतंत्र बातमी दिली होती. ती सुध्दा तुम्ही वाचू शकता..

परमवीर यांनी 100 कोटींचा लेटर बॉंम्ब टाकल्यानंतर हे प्रकरण चांगलंच चर्चेत आलं. परमवीर सिंह यांच्या आरोपांवरुन ॲड जयश्री पाटील यांनी या संपुर्ण प्रकरणाची CBI चौकशी व्हावी. अशी जनहित याचीका न्यायालयात दाखल केली होती. आणि याच याचिकेमुळे अनिल देशमुखांना राजीनामा द्यावा लागलाय.

4) मेहबूब शेख (राष्ट्रवादी कॉंग्रेस)

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केला.

१४ नोव्हेंबर रोजी मेहबूब शेख यांनी भेटायला बोलावून माझ्यावर बलात्कार केल्याची तक्रार एका महिलेनं औरंगाबादच्या सिडको पोलीस ठाण्यात दिली. या तक्रारीनंतर भारतीय जनता पक्षानं राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य केलं.


गृहमंत्री देखील राष्ट्रवादी कॉंग्रेसचेच असल्याने हे प्रकरण दाबलं जातंय असा आरोप भाजपने केला. विरोधकांनी तेव्हा देखील गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.

5) राजेश विटेकर (राष्ट्रवादी कॉंग्रेस)

परभणीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेश विटेकर यांनी माझे अश्लील व्हीडिओ तयार करुन माझ्यावर वर्षभर अत्याचार केले. असा आरोप एका महिलेने केला. या महिलेने भुमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांच्या मदतीने पुण्यात पत्रकार परिषद घेत. हा अत्याचाराचा आरोप केला.


"मी या सगळ्याविरोधात तक्रार केली होती. माझ्याकडे सर्व पुरावेही आहेत. पण मला केवळ तपास सुरु असल्याचे सांगितले जाते. तर राजेश विटेकर यांनी शरद पवार यांच्या पाठबळामुळे माझ्यावर गुन्हा दाखलच होणार नाही" असे सांगून मला घाबरवल्याचे या पीडित महिलेने सांगितलं होतं.

Tags:    

Similar News