गावकऱ्यांनी वीज मागितली; भाजप आमदार म्हणाले, आधी मुलीची शपथ घेऊन सांगा मला मतदान केले

Update: 2021-07-13 06:56 GMT

उत्तरप्रदेशमधील मीरनपूर कटरा मतदारसंघांचे भाजप आमदार वीर विक्रम सिंह यांचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये विजेची मागणी करणाऱ्या गावकऱ्यांना, 'आधी आपल्या मुलीची शपथ घेऊन सांगा की, मला मतदान केले आहे, अपेक्षा त्यांच्याकडून केली जाते ज्यांना आपण काही दिले आहे, असे हे आमदार म्हणतायत.

नुकत्याच मतदारसंघात पार पडलेल्या एका वृक्षारोपण कार्यक्रमास संबोधित करताना भाजप आमदार वीर विक्रम सिंह परिसरातील त्यांनी केलेल्या विकासकामांचा उल्लेख करीत भाषण ठोकत होते. याचवेळी काही गावकऱ्यांनी गावातील विजेचा मुद्दा मांडला. त्यावर बोलताना आमदार साहेब म्हणाले, "तुम्ही गंगेकडे हात करून, आपल्या मुलीची शपथ घेऊन मला मतदान केल्याचे म्हणाले तर, मी आजच विजेची सोय करून देतो."

पुढे गावकरी म्हणाले आम्ही तुम्हाला विनंती करतो, पण यावर बोलताना आमदार म्हणाले की, "विनंती त्यांच्याकडे केली जाते, ज्यांना तुम्ही काहीतरी दिलं असेल. आणि जर तुम्ही काही दिलं असेल तर तुम्ही माझ्या छातीवर बसू शकतात. तुम्ही मला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करू नका. माझे वडील चार वेळे आमदार राहिले असून, मी सुद्धा आमदार आहे. हे महाशय येथेच थांबले नाही, तर मला माहित नाही कोणत्या बुथवर मला कुणी किती मतदान केले असं म्हणत, तुम्ही जर मला मतदान केले असते आणि मग मी वीज दिली नसती तर तुम्ही मला बोलू शकत होता, असेही म्हणाले.

Tags:    

Similar News