"संस्काराची झलक कपड्यांत नाही तर भाषेत दिसते"

चित्रा वाघ यांचा उत्तराखंडचे मुख्यमंत्री आणि भाजपनेते तिरथसिंह रावत यांना घरचा आहेर;

Update: 2021-03-19 11:15 GMT

उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथसिंग रावत यांनी नुकतीच मुली व महिलांच्या पोशाखांविषयी केलेल्या टीकेवर खळबळ उडाली. अशा बेताल वक्तव्यामुळे सध्या तीरथसिंग रावत चांगलेच ट्रोल होत आहेत. यावर आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीच "संस्काराची झलक कपड्यांत नाही तर भाषेत दिसते" असं म्हणत रावत यांना घरचा आहेर दिला आहे.

दरम्यान, तीरथसिंग रावत म्हणाले होते की, एकदा ते विमानाने बाहेर कुठेतरी जात असताना दोन मुलांसह फाटलेल्या जीन्स घातलेली एक स्त्री पाहिली. ती महिला एक स्वयंसेवी संस्था चालवते, तर तिचा नवरा जेएनयूमध्ये प्राध्यापक होता. रावत म्हणाले की अशा महिला आपल्या मुलांना काय संस्कार देणार.

Full View


Tags:    

Similar News