राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांच्यावर आज पक्षाने एक मोठी जबाबदारी सोपवली आहे. मागच्या काही महिन्यांपूर्वीच रूपाली पाटील मनसेला रामराम ठोकून राष्ट्रवादी मध्ये आल्या होत्या. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्या राष्ट्रवादीमधील प्रवेशानंतर त्यांना कुठलं पद दिले जाणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा होती. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाची निवड करण्यात आली या वेळीही त्यांचं नाव मोठ्या प्रमाणावर चर्चेत होती. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने रुपाली पाटील यांच्यावर पुणे शहर उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे.
आजच पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर झाली. त्यानंतर रूपाली पाटील यांच्यावर पक्षांना ही जबाबदारी देऊन निवडणुकीची सुरू केली असल्याचे म्हंटले जात आहे. रुपाली ठोंबरे या प्रत्येक प्रश्नावर आक्रमकपणे भूमिका मांडत असतात. मनसे नंतर राष्ट्रवादीत सुद्धा त्यांनी एक फारीरब्रँड नेता म्हणून आपली ओळख निर्माण केले आहे. पुणे शहर उपाध्यक्ष पदी निवड झाली असल्याची माहिती रुपाली ठोंबरे यांनी स्वतः फेसबूक वर पोस्ट शेअर करत दिली आहे.