"राज्याच्या हक्काचा निधी मागीतला तर केंद्र सराकर 5% व्याजाने कर्ज घेण्याचा सल्ला देतं"
खासदार फुलो देवी नेतम यांनी व्यक्त केली खंत;
14 हजार 628 कोटींचा कर छत्तीसगड राज्य केंद्र सरकारला देतं. मात्र केंद्र सरकारने राज्याचा 3 हजार 109 कोटींचा GST चा हिस्सा अजून दिलेला नाही. एवढच नाही तर राज्याच्या हक्काचा निधी मागीतला तर केंद्र सराकर 5% व्याजाने कर्ज घेण्याचा सल्ला देतय. त्यामुळे राज्य सारकारला विवीध योजनांसाठी निधीची कमतरता जाणवते. तेव्हा सरकारने लवकरात लवकर राज्यांच्या हक्काचा GST चा हिस्सा त्यांचा द्यावा. अशी मागणी छत्तीसगड कॉंग्रेसच्या खासदार फुलो देवी नेतम यांची राज्य सभेत केली आहे.