एकनाथ शिंदेंचा शिवसेनेला आणखीन एक दणका..

Update: 2022-08-11 05:21 GMT

राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर उद्धव ठाकरेंसोबत असणाऱ्या अनेकांची राज्य सरकारच्या पदांवरून उचलबांगडी सुरु आहे. राज्यात सत्तेत असलेल्या शिंदे गटाने अनेक शिवसेनेच्या पधादिकार्यांना पायउतार करण्यास सुरवात केली आहे. आता शिवसेनेच्या महिला पदाधीकारी ज्योती ठाकरे यांची महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्ष पदावरील नियुक्ती रद्द केली आहे. ज्योती ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंसोबत राहण्याचा निर्णय घेतला होता.

ज्योती ठाकरे ज्या विभागातून येतात त्या पालघर विभागातील अनेक शिवसेना नेत्यांनी शिंदे गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला. यामध्ये खासदार राजेंद्र गावित, आमदार श्रीनिवास वनगा, जिल्हाप्रमुख राजेश शहा त्याचबरोबर अनेक नगरसेवक जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सदस्यांनी शिंदे गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला. मात्र ज्योती ठाकरे यांनी ठाकरे गटासोबतच राहण्याचा निर्णय घेतला. ज्योती ठाकरे यांनी हा निर्णय घेतल्यानंतर शिंदे सरकारने त्यांना चांगलाच दणका दिला आहे. ज्योती ठाकरे यांची महिला आर्थिक विकास महामंडळ पदाच्या अध्यक्षपदावर नियुक्ती रद्द करण्यात आली आहे

Tags:    

Similar News