अनेक दिवस राज्याच्या राजकारणात चालू असलेल्या सत्तानाट्यानंतर आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री पदाच्या राजीनाम्यानंतर ठाकरे सरकार कोसळले आहे. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर सध्या समाज माध्यमांवर देवेंद्र फडणवीस यांना चंद्रकांत दादा पाटील पेढे भरवत आनंद व्यक्त करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. समाजमाध्यमांवर आता हीच चर्चा आहे की येत्या काही दिवसात देवेंद्र फडणवीस हे बंडखोर शिंदे गटासोबत सरकार स्थापन करतील.
त्यामुळे पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांचे सरकार येणार अशी चर्चा समाज माध्यमांवर सुरू आहे. देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार या चर्चेनंतर समाज माध्यमांवर त्यांचा एक जुना व्हिडिओ पुन्हा व्हायरल होतो आहे. तुम्हाला आता हा व्हिडिओ कोणता आहे याची आठवण झालीच असेल. तर हो तोच व्हिडिओ आहे ज्यावेळी उद्धव ठाकरे यांनी "मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल" असं म्हटलं होतं. त्यामुळे सध्या समाज माध्यमांवर देवेंद्र फडणवीस यांच्या मी पुन्हा येईल या व्हिडिओची चर्चा आहे. ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर 'अध्यक्ष महोदय, मी पुन्हा येईल असे अनेक मिम्स आता व्हायरल होत आहेत.
Repost