Fact Check : चिदंबरम यांची सून भाजपच्या प्रचारात ?

Update: 2021-03-31 09:15 GMT

तमिळनाडू राज्यात सध्या विधानसभा निवडणूकांचा माहौल आहे. याच तापलेल्या वातावरणात भाजपचं एक ट्वीट चर्चेला आलं. 28 मार्चला भाजपच्या सोशल मीडिया टीमने ट्विटरवर एक पाच मिनीटांचा व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओत एक महिला शास्त्रीय नृत्य करताना दिसते.

आता तुम्ही म्हणाल त्यात मग एवढं? पण लोकहो ती नृत्य करणारी महिला इतर कुणी नसुन कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांची सून डॉक्टर श्रीनिधि चिदंबरम यांचा आहे. आता एवढ सगळं झाल्यावर बवाल तर होणारच ना..

भाजपने त्यांच्या 'BJP Tamilnadu' या अधिकृत ट्वीटर हॅंडलवर राज्याची संस्कृती आणि सभ्यता दर्शविण्यासाठी 28 मार्च रोजी एक व्हिडिओ पोस्ट केला होता. त्याचं टायटल होतं 'कमल को खिलने दो, तमिलनाडु को बढ़ने दो' या व्हिडीओत एक महिला शास्त्रीय नृत्य करताना दिसते.


कोण आहे ती महिला?

शास्त्रीय नृत्य करणारी ती महिला इतर कुणी नसुन कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांचे चिरंजीव कार्ती चिदंबरम यांची पत्नी डॉक्टर श्रीनिधि चिदंबरम या आहेत.

..आणि भाजपची चूक समोर आली

भाजपचे हे ट्वीट टाइम्स नाऊच्या पत्रकार शिल्पा नायर यांनी पाहिलं. त्यांनी हे ट्वीटचा स्क्रिन शॉट ट्वीट करत भाजपची ही चूक समोर आणली. 

शिल्पा यांच्या ट्वीटवर श्रीनिधी चिदंबरम यांनीही "हे हास्यास्पद आहे. भाजपने प्रचारासाठी माझा फोटो वापरलाय." अशी कमेंट केली आहे.

गाण देखील विशेष..

'सिमोझी' हे हे खूप लोकप्रिय तामिळ गीत आहे. ते प्रसिध्द संगीतकार ए. आर. रहमान यांनी संगीतबध्द केलंय. विशेष म्हणजे याचे बोल तमिळनाडूचे तात्कालीन मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांनी २०१२ च्या जागतिक तामिळ परिषदेच्या वेळी लिहिले आहेत.

दरम्यान, आपली चूक लक्षात आल्यावर भाजने लगेचच हे ट्वीट डिलीट केलं आहे.

Tags:    

Similar News