बुधवारी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्यात धक्काबुक्की झाली . त्यावर सुषमा अंधारे यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे . "सत्ताधारांनी घातलेला गोंधळ हा विधिमंडळाच्या गौरवशाली परंपरेला गालबोट लावणार आहे. महाराष्ट्राचे जनता भाजपचे हे गुंडगिरी आणि दादागिरी चे वर्तन पाहत आहे .ते आज बोलत नसले तरी याचे उत्तर ते मतपेट्यांमधून देतील". असा इशारा सुषमा अंधारे यांनी दिला आहे .विरोधी पक्ष म्हटल्यानंतर सत्ताधारी पक्षावर टीका करणे हे स्वाभाविक आहे .
"50 खोके एकदम ओके"ही घोषणा सत्ताधाऱ्यांच्या जिव्हारी लागली आणि त्यामुळे त्याला काय करायचं हे सुचत नव्हते. त्यामुळे आज ठरवून त्यांनी घोषणा दिल्या यासाठी तीन दिवसाचा वेळही घेतला .त्यामुळे हा कट पूर्वनियोजित होता . त्यांनी ठरवून या घोषणा दिल्या .'उलटा चोर कोतवाल को डाटे'असा हा प्रकार आहे,असं मत सुषमा अंधारे यांनी व्यक्त केले.
'भाजप पक्षाच्या सर्व सदस्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपण जे वर्तन करत आहोत ते वर्तन ते महाराष्ट्र बघत आहे त्यामुळे महाराष्ट्राची नजरेत एकूण तुमची प्रतिमा काय होती याचा तरी किमान विचार या सगळ्यांनी करायला हवा',असा संदेश सुषमा अंधारे यांनी दिला आहे .