शिवसेनेत प्रवेश करताच सुषमा अंधारेंना सुखद धक्का

मला पक्षाकडून कोणतीच अपेक्षा नाही फक्त देशाचा संविधाना वाचवण्यासाठी मला भाजप विरोधात लढायचा आहे;

Update: 2022-07-28 10:40 GMT


शाहू फुले आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते तसेच गणराज्य संघाच्या प्रमुख आणि या संघामार्फत संविधानिक हक्कांबाबत जनजागृती करण्याचं काम केलेलं सुषमा अंधारे यांनी गुरुवारी शिवसेनेत प्रवेश केला सुषमा अंधारे यांच्या हाती शिवसेना उपनेता नीलम गोरे यांनी शिवबंधन बांधलं आहे

"लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात पण मी त्यापैकी नाही ठाकरेंवर संकटाची वेळ आलेली असताना भावाच्या खांद्याला खांदा लावून लढण्यासाठी आज शिवसेनेत प्रवेश करते मला पक्षाकडून कोणतीच अपेक्षा नाही फक्त देशाचा संविधाना वाचवण्यासाठी मला भाजप विरोधात लढायचा आहे" असं मत सुषमा अंधारे यांनी शिवसेना पक्षप्रवेशावेळी व्यक्त केलं

सुषमा अंधारेंच्या शिवसेना प्रवेशामुळे आता शिवसेनेला अजून एक धडाडीची महिला नेता मिळाली आहे.तर उद्धव ठाकरेंनी देखील त्यांच्या खांद्यावर महत्वाची जबाबदारी दिली आहे. त्यांनी सुषमा अंधारे यांचे नियुक्ती शिवसेनेच्या उपनेते पदी केली आहे यावेळी पुढील काळात ग्रामीण भागातून कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर नोंदणी व्हावी अशी अपेक्षा सुद्धा उद्धव ठाकरे यांनी सुषमा अंधारे यांच्याकडून व्यक्त केली आहे.

त्याचबरोबर पक्ष प्रवेशानंतर सुषमा अंधारे यांनी सगळ्यांच्या विश्वासाला कधीच तडा जाऊ देणार नाही त्याचबरोबर आज जोरजोरात गळे काढून लढायच्या नंतर दुसऱ्या गटात चांदण्याची असा प्रकार माझ्याकडून घडणार नाही नीलम ताई मला आईसारख्या आहेत तर सचिन आहेर यांच्या रूपाने बाहेरचा माणूस माझ्यासोबत आहे असेही त्या म्हणाल्या आहेत

Tags:    

Similar News