शिवसेनेत प्रवेश घेण्याआधीचं सुषमा अंधारेंचं ट्विट व्हायरल

शिवसैनिकांमध्ये एक नवी उमेद जागी करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.;

Update: 2022-07-28 10:13 GMT

  एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना पक्षातून आमदार बाहेर पडले .त्यानंतर शिवसेनेला उतरती कळा लागली आहे का असा प्रश्न उपस्थित झाला होता.पण आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि फुले आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्या ,प्रवक्त्या सुषमा अंधारे गुरवारी प्रवेश घेतला आहे.दरम्यान त्यांनी एक ट्विटही शेअर केलं आहे.

हा प्रवेश घेण्याआधी त्यांनी शिवसैनिकांमध्ये एक नवी उमेद जागी करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.शिवसेनेकडून काय मिळणार यापेक्षा मी शिवसेनेला काय देऊ शकते हे अधिक महत्त्वाचे असल्याचं त्या म्हणाल्या आहेत.

यासंबंधीत त्यांनी एक ट्विटही केले आहे." महाराष्ट्रातील समविचारी भावांनो आणि बहिणींनो संविधानिक लोकशाहीची चौकट आपल्या जगण्याचा मुलाधार आहे ही चौकट उध्वस्त करण्याचा पाशवी खेळ भाजपा खेळत आहे पण दिल्लीच्या तक्तासमोर महाराष्ट्र ना कधी झुकला आहे ना झुकणार आहे"

Tags:    

Similar News