सुषमा अंधारेंनी साधला राज ठाकरेंवर निशाणा

Update: 2022-07-30 10:00 GMT

 मुंबईतील एका कार्यक्रमात बोलत असताना "महाराष्ट्रात मी लोकांना सांगत असतो की मुंबई ठाण्यातून गुजराती आणि मारवाडी निघाले तर मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही" असं वादग्रस्त वक्तव्य भगतसिंग कोश्यारी यांनी केले आहे.राज्यपालांच्या या वक्तव्यावर समाज माध्यमांवरून टीका होत आहे.

दरम्यान शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा ट्विटद्वारे समाचार घेतला होता. राज्यपाल हे राज्याचे पालक असतात. अन पालकाने राज्यप्रती पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन किंवा आकस बुद्धी न ठेवता ममत्ववाने राज्याचे संगोपन करणे ही संविधानिक जबाबदारी आहे.

परंतु महामहीम कोशारीजी यांचेकडून इतक्याही जास्त अपेक्षा ठेवू नयेत. कारण ...असं ट्विट सुषमा अंधारे यांनी केले होते.

यानंतर आता पुन्हा एकदा सुषमा अंधारे यांनी राज ठाकरे आणि निलेश राणे यांच्यावर निशाणा साधला आहे . #ढोंगी म्हणत हे ट्विट त्यांनी राज ठाकरे आणि निलेश राणे यांना टॅग केले आहे . "मुंबई तोडण्याचे उघडपणे कारस्थान, महाराष्ट्राचा सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक इतिहास पुसण्याचा प्रयत्न घटनात्मक पदावरील राज्यपालांकडूनच चालू असताना वंदनीय बाळासाहेबांचे खरे वारसदार आहोत म्हणणारे सगळे सभ्यसज्जन लोक आता का गप्प असतील बरे?"असे ट्विट त्यांनी केले आहे.


Tags:    

Similar News