देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाची मोठी चर्चा आहे. तर महाराष्ट्रातून मोदी यांच्या भाषणावर महाविकास आघाडीने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
आज दिल्ली येथे माध्यमांशी बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधानांच्या वक्तव्याने मनस्वी दु:ख झाल्याचे सांगितले.
पंतप्रधानजी आपसे नाराज नही... हैरान हूँ मैं... माझ्या महाराष्ट्राबद्दल तुम्ही असं कसं बोललात... आमच्यावर का टीका केली... का विरोधात बोललात... का राज्याराज्यात द्वेष पसरवत आहात असा थेट सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज केला.
महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तासमोर कधी झुकला नाही आणि कधी झुकणार नाही. हा कुठल्या पक्षाचा प्रश्न नाही तर हा राज्याच्या अस्मितेचा प्रश्न आहे. राज्यातील भाजप आमदार खासदारांनी याविरोधात उभं राहिले पाहिजे. असं मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले आहे..