राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांसोबत शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला हा पाठिंबा जाहीर केल्यानंतर काही क्षणातच अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या काही मोठ्या नेत्यांनी सुद्धा मंत्रीपदाच्या शपथ घेतल्या. या सगळ्या प्रकारानंतर राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी भाऊ अजित पवार यांच्या विषयी काही वक्तव्य केली आहेत ती वक्तव्य नक्की काय आहेत पाहुयात..
दादा आणि माझ्यात जे काही बोलणं झालं हे आम्हालाच माहितीये. आमच्यात वाद होऊच शकत नाही. माझ्या मनात अजितदादा कायम मोठा भाऊ राहिल. वयक्तीक पातळीवर आमच्यात वाद होऊच शकत नाही. मात्र, पक्षाच्या पातळीवर निर्णय घेयला पाहिजे, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. काल जी पत्रकार परिषद झाली या पत्रकार परिषदेत सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांवर थेटपणे बोलणं टाळले व सोडून गेलेल्या प्रत्येकाविषयी आदर आहे. अजितदादा परत आले तर आनंदच असेल असं देखील त्या म्हणाल्या..