ईडी, सीबीआय फक्त चलन फाडण्यासाठी - सुप्रिया सुळे

Update: 2021-09-21 03:13 GMT

महाराष्ट्रात केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होत असून हे सर्व महाराष्ट्र पाहत आहे. किरीट सोमय्या हे सीबीआय, ईडीचे मुख्य आहेत का? रस्त्यावरती चलन काढतात त्याप्रमाणे ईडीची अवस्था झाली आहे. यांच्या कारवाईला काही दर्जा आहे की? नाही असे म्हणत राष्ट्रवादी पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी किरीट सोमय्या यांच्यावरती निशाण साधला आहे.

सध्या महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारमधील काही नेत्यांसह मंत्र्यांवर ईडीच्या कारवाया होत आहेत. केंद्रामध्ये भाजपचे सरकार आहे आणि ते केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोप महाविकास आघाडीतील अनेक नेते सध्या करत आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या हे सध्या महाविकासआघाडी मधील बऱ्याच नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. दर वेळेस ते एक नवीन नाव घेऊन पुढे येतात. मागच्या काही दिवसांपूर्वी त्यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. या सगळ्या गोष्टींवरून खासदार सुप्रिया सुळे यांनी किरीट सोमय्या यांच्या वरती जोरदार निशाना साधला आहे.

ईडी, सीबीआय यांचा काही दर्जा आहे की नाही? खोटे आरोप केल्याने त्या कुटुंबाची काय अवस्था होते. त्यांना कोणत्या अवस्थेतून जावे लागते याचा विचार केला पाहिजे. आमच्याकडे असला की देशद्रोही आणि त्यांच्याकडे मात्र धुवून निघतो. असा टोलाही सुप्रिया सुळे यांनी लगावला.

Tags:    

Similar News