राज्यपालांच्या वादग्रस्त विधानावर सुप्रिया सुळेंच ट्विट व्हायरल

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुंबईबद्दल वादग्रस्त विधान केलं आहे.;

Update: 2022-07-30 04:59 GMT



राज्यात सातत्याने राजकीय घडामोडी घडत असताना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुंबईबद्दल वादग्रस्त विधान केलं आहे. मुंबईतील एका कार्यक्रमात बोलत असताना "महाराष्ट्रात मी लोकांना सांगत असतो की मुंबई ठाण्यातून गुजराती आणि मारवाडी निघाले तर मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही" असं वादग्रस्त वक्तव्य भगतसिंग कोश्यारी यांनी केले आहे. या विधानामागे राज्यपालांचा नेमका हेतू काय हा प्रश्न उपस्थित झाला आहे . त्याचबरोबर मुंबईला काही वर्षांपासून मुंबईला केंद्रशासित प्रदेश करण्याच्या तयारी केंद्र सरकार आहे अशी चर्चा सुरू आहे.राज्यपालांच्या या वक्तव्यावर समाज माध्यमांवरून टीका होत आहे.

दरम्यान "राज्यपाल महोदयांचे हे विधान त्या हुतात्म्यांचा अवमान करणारे आहे. हे शहर कष्टकरी, कामगार आणि मजूरांनी कष्टाने उभारले. मुंबईवर पहिला हक्क या सर्वांचा आहे. जो या मातीत जन्माला आला आणि मुंबईवर प्रेम करतो त्या सर्वांसाठी ही 'आमची मुंबई ' आहे."असं ट्विट सुप्रिया सुळेंनी केलं आहे.

त्याचबरोबर महाराष्ट्राचे राज्यपाल मा. भगतसिंह कोश्यारी यांचे विधान मराठी माणसांना कमी लेखणारे असे आहे. त्यांच्या विधानाचा मराठी माणूस म्हणून मी निषेध करते.याच मुंबईसाठी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०५ हुतात्म्यांनी रक्त सांडले. लाखो मराठी माणसांच्या वज्रमुठीमुळे हे शहर उभा राहिले आहे."सुप्रिया सुळेंनी राज्यपालांच्या वादग्रस्त विधानाचा विडिओ शेअर करत हे ट्विट केलं आहे .

Tags:    

Similar News