आमच्या पवार फॅमिलीत तुम्हाला काय वाटेल ? हा विचार नसतो,निर्णय येतो

Update: 2023-07-02 11:48 GMT


सुप्रिया सुळे यांनी कार्यक्रमात एक विधान केले होते. राष्ट्रवादीच्या या कार्यक्रमात पक्षाचे सर्व नेते उपस्थित होते .महाराष्ट्राचे नव्याने उपमुख्यमंत्री झालेले अजित पवारही उपस्थित होते .या कार्यक्रमात सुरुवातीलाच सुप्रिया सुळे यांनी छगन भुजबळांनंतर मी बोलणं म्हणजे माझंही करेक्ट कार्यक्रम केला आहे असे मजेशीर विधान केले होते . त्यांनतर त्यांच्या भाषणात त्या म्हणाल्या होत्या कि ,"सगळं स्थिर असलं कि पवारसाहेब कंटाळतात संघर्ष हा पवारसाहेबांच्या गुण आहे ,सगळं चांगलं चाललं असेल तेंव्हा त्यांना कंटाळा येतो ,जेंव्हा काहीतरी आव्हान येतं तेंव्हा त्यांना जास्त मजा येते काम करायला " असेही विधान केले होते .

Full View

आपल्या शाळेतील गुणवत्तेविषयीचे किस्से सांगताना सुप्रिया सुळेंनी एक विशेष विधान केले ते म्हणजे ,"आमच्या पवार फॅमिलीमध्ये सायकॉलॉजीचा कुणीच विचार करत नाही ,तुम्हाला काय वाटेल हा विचार नसतो ,तो निर्णय येतो . पण माझ्या मानसिकतेचा कुणी विचार केलाय का? साहजिकच आपण म्हणतो कि शाळेत हुशार असलो तर अरे वा वडील हुशार आहेत आणि नापास झालो तर म्हणणार आईच लक्ष नाही ,याचे classic उदाहरण मी आहे . आणि यासगळ्या प्रवासात मला जी जबाबदारी तुम्ही दिली आहे त्याबद्दल आभार मानते "

Full View

सध्याची परिस्थिती पाहता पुन्हा एकदा अजित पवार यांनी निर्णय घेतला आहे. सध्याचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी शपथ घेतली आहे. पण यावेळी सुप्रिया सुळे यांची मानसिकता काय असेल ? यावर संजय राऊत यांचेही एक ट्विट viral झाले आहे .

महाराष्ट्राचे राजकारण सतत बदलत जात आहे. राष्ट्रवादीच्या दिग्ग्ज नेत्यांकडून म्हंटले जात आहे कि हे लोटस ऑपरेशन आहे. पण राजकारणाच्या झालेल्या चिखलातून हे कमळ फुलत आहे का ? हा प्रश्न उपस्थित होत आहे.

Tags:    

Similar News